Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमया महिलेला ओळखत असाल तर पिंपळनेर पोलिसांशी संपर्क साधा

या महिलेला ओळखत असाल तर पिंपळनेर पोलिसांशी संपर्क साधा


बीड (रिपोर्टर)- बीड-परळी महामार्गावरील घोडका राजुरी तलावाजवळ पाच दिवसांपुर्वी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. तिची ओळख अद्याप पटलेली नसून सदरील महिलेस कोणी ओळखत असेल तर पिंपळनेर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक आघाव यांनी केले आहे.

23 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता बीड-परळी रोडवरील घोडका राजुरी तलावाजवळ असलेल्या आदित्य हॉटेलसमोर एका महिलेस अज्ञात वाहनाने धडक दिली. सदरील महिलेचा मृतदेह घटनास्थळी मिळून आला. गेल्या पाच दिवसांपासून संबंधित महिलेची ओळख पटत नाही. संबंधित महिला कोणाच्या ओळखीची असेल तर त्यांनी पिंपळनेर पोलिसांशी 02442 – 254533, 9421733252 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक आघाव यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!