Home बीड शेतकर्‍याचा सर्पदंशाने मृत्यू

शेतकर्‍याचा सर्पदंशाने मृत्यू


बीड (रिपोर्टर)- शेतातील पिकाचे रानडुकरांपासून संरक्षण करण्यासाठी शेतात गेलेल्या एका 38 वर्षीय शेतकर्‍याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना कुटेवाडी येथे घडली. वारंवार वन विभागाला रान डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

दिनकर कुटे (रा. कुटेवाडी) असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. ते 25 नोव्हेंबर रोजी रात्री आपल्या शेतातील पिकांचे रान डुकरांपासून संरक्षण करण्यासाठी शेतात गेले होते. रात्री त्यांना अचानक साप चावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे साडेतीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. कुटेवाडी परिसरात रान डुकरांनी थैमान घातले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. वन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत असतानाही वन विभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांतून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version