Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडआष्टीमहावितरण कार्यालयाला हळदकुंकू, अगरबत्ती शेतकर्‍यांचे हरिनामाच्या गजरात लोटांगण

महावितरण कार्यालयाला हळदकुंकू, अगरबत्ती शेतकर्‍यांचे हरिनामाच्या गजरात लोटांगण

आष्टी (रिपोर्टर) महावितरण कंपनीची मनमानी चालू असुन आज पर्यत लाक्षणिक उपोषण तहसीलदार कार्यालय आष्टीसह रस्ता रोको आंदोलन धानोरा येथे करून सुद्धा महावितरण आपलीच हुकमी राजवट गाजवत असुन आंदोलनात दिलेला शब्द पाळत नसल्यामुळे संपुर्ण आष्टी तालुक्यातील शेतकरी बांधवांनचा विद्युत पुरवठा खंडित केला असून शेतकरी बांधवांकडून 8 हजार रूपये प्रति कनेक्शन भरना करून घेत असलेच्या निषेधार्थ आज दि.29 नोव्हेंबर रोजी महावितरण कार्यालयाला हार अगरबत्ती हळद कुंकु सह श्रीफळ फोडून पूजन करून गाधी गिरी मार्गाने उपअभियंता कार्यलयात आष्टी ते तहसील कार्यालयापर्यंत सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर रामचंद्र घोडके सुलेमान देवळा यांच्यासह शेतक-यांनी लोटांगण घेत आंदोलन केले, ह.भ.प. झुंबर महाराज बोडखे सह शेतकरी, लोंटांगण समयी उपस्थित होते. यावेळी शिवसंग्राम संघटणेचे आष्टी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी सह आष्टी तालुक्यातील अनेक सरपंच सह सरपंच राम बोडखे,सरपंच सावता ससाणे ,सचिन आमले, कासमभाई शेख, मावळी थोरवे,बाबु धनवडे, छगन साबळे, धनंजय फिसके सह सामाजिक संघटना सह शेतकरी संघटनांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!