Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीड19 डिसेंबरला बीडमध्ये राज्यस्तरीय मॅराथॉन स्पर्धा वीज कंपनीने दादागिरी करू नये -आ.मेटे

19 डिसेंबरला बीडमध्ये राज्यस्तरीय मॅराथॉन स्पर्धा वीज कंपनीने दादागिरी करू नये -आ.मेटे

महाआघाडी सरकार दोन वर्षात अपयशी ठरलं
बीड (रिपोर्टर)- सदृढ आरोग्याच्या दृष्टीने शिवसंग्रामच्या वतीने 19 डिसेंबर रोजी बीड येथे राज्यस्तरीय मॅराथॉन स्पर्धा आयोजीत करण्यात आली. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील स्पर्धक सहभागी होणार असून 18 ते 60 वयापेक्षा जास्त नागरिकांना सहभागी होता येणार असल्याची माहिती आ. विनायक मेटे यांनी दिली. मेटे यांनी राज्य सरकारच्या दोन वर्षाच्या कारकिर्दीबाबतही भाष्य करून सरकारवर टिकेची झोड उठवली. सर्वच पातळ्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. महावितरणने वीज कनेक्शन तोडण्याची मोहिम सुरू केली, हा प्रकार अन्यायकारक आहे. कंपनीने दादागिरी करू नये, असा इशाराही मेटे यांनी दिला.


मॅराथॉन स्पर्धेच्या निमित्ताने आ. विनायक मेटे यांनी शिवसंग्राम भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला बी.बी. जाधव, जिल्हाध्यक्ष काकडे, घुमरे, रामहरी मेटे, सुहास पाटील, काशीद, अशोक सुखवसे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना आ. मेटे म्हणाले की, आरोग्य सदृढ राहावे या दृष्टीकोनातून मॅराथॉन स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. 19 डिसेंबर रोजी ही स्पर्धा बीड शहरामध्ये होत आहे. सकाळी सहा वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज क्रिडा संकुलापासून ते चर्‍हाटा फाटा या दरम्यान स्पर्धा होत आहे. 18 ते 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना यात सहभागी होता येणार आहे. विजेत्यांना रोख रक्कम व ट्रॉफी देण्यात येणार आहे. संबंधिताना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. दरम्यान आ. मेटे यांनी राज्य सरकारच्या नाकर्तेपणाबाबतही भाष्य केले. राज्य सरकार दोन वर्षात अपयशी ठरले. मराठा आरक्षण राज्य सरकारने घालवले असून मुस्लिम आरक्षणासंदर्भात या सरकारने कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही. धनगर आरक्षण व ओबीसींच्या आरक्षणा-बाबतही सरकार काही बोलायला तयार नाही. वीज मंडळाने दादागिरी सुरू केली. शेतकर्‍यांच्या विजेचे कनेक्शन तोडले जात असून विज कंपनीची ही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मेटे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!