Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडछत्रधारी डीएम, सव्वा लाख बेघरांना घर रमाई आवास योजनेतून राज्यात सव्वा लाख...

छत्रधारी डीएम, सव्वा लाख बेघरांना घर रमाई आवास योजनेतून राज्यात सव्वा लाख बेघरांना घर

घरकुल उभारणीच्या उद्दिष्टास राज्य शासनाची परवानगी; बीड जिल्ह्यात सर्वाधिक घरकुलांना मंजुरी, ग्रामीण भागात 10 हजार तर शहरी भागात 5 हजार बेघरांना मिळणार घर


मुंबई (रिपोर्टर) अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेनंतर्गत राज्यात ग्रामीण भागात 1 लाख 13 हजार 571 व शहरी भागात 22 हजार 676 घरकुलांच्या उद्दिष्टास सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाने मान्यता प्रदान केली असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव अ. को. अहिरे यांनी याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिल्याचा निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयाअंतर्गत मराठवाड्यात सर्वाधिक घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून, बीड जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक ग्रामीण च्या 10 हजार व शहरी भागाच्या 5 हजार अशा एकूण 15 हजार घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे.

विभागनिहाय मान्यता मिळालेली आकडेवारी
मराठवाड्यात औरंगाबाद विभागात ग्रामीणच्या 30116 व शहरी भागाच्या 7565 घरकुलांना मंजुरी
लातूर विभागात ग्रामीणच्या 24274 तर शहरी भागाच्या 2770 घरकुलांना मंजुरी
नागपूर विभागात ग्रामीणच्या 11677 तर शहरी विभागाच्या 2987 घरकुलांना मंजुरी
अमरावती विभागात ग्रामीणच्या 21978 तर शहरी भागातील 3210 घरकुलांना मंजुरी
पुणे विभागात ग्रामीणच्या 8720 तर शहरी भागातील 5792 घरकुलांना मंजुरी
नाशिक विभागात ग्रामीणच्या 14864 तर शहरी भागातील 346 घरकुलांना मंजुरी
मुंबई विभागात ग्रामीणच्या 1942 तर शहरी भागातील 86 घरकुलांना मंजुरी

Most Popular

error: Content is protected !!