Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडरूग्णवाहिका-कारची समोरासमोर धडक एक जागीच ठार, तीन गंभीर जखमी

रूग्णवाहिका-कारची समोरासमोर धडक एक जागीच ठार, तीन गंभीर जखमी


बीड-धामणगाव -नगर राज्य महामार्गावरील घटना


घाटा पिंपरी( रिपोर्टर)- बीडवरून कोल्हापुर कडे जात असलेल्या भरधाव कारने नगरवरून बीडकडे जात असलेल्या रूग्णवाहिकेला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार मधील एक जण जागीच ठार झाला तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्याना अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 8:30 दरम्यान बीड धामणगांव नगर राज्य महामार्गावर सुर्डी फाटा येथे घडली. अवधुत नंदकुमार गरगटे रा.इचलकरंजी वय 31 वर्ष असे अपघात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पुण्याला रूग्ण घेऊन गेलेली रूग्णवाहिका चक.20,एॠ.5130 ही बीडला जात असताना बीडवरून कोल्हापुर कडे जात असलेली कार चह.09, इा.5986 ही भरधाव वेगात असल्याने सुर्डी फाट्यावरील वळणावर समोरासमोर दोनही वाहनाची जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात अवधुत गरगटे हा जागीच ठार झाला असुन अन्य तिघेजण गंभीर जखमी झाल्याने त्याना तातडीने अहमदनगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले असुन त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. ही घटना बीड धामणगांव नगर राज्य महामार्गावरील सुर्डी फाटा येथे मंगळवारी सकाळी साडे आठ वाजता घडली, रूग्ण वाहिका चालक संतोष सुरवसे रा.बीड हा किरकोळ जखमी झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!