Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगावनिराधारांचे रखडलेले अनुदान तात्काळ वाटप करा माजलगावमध्ये रस्ता रोको

निराधारांचे रखडलेले अनुदान तात्काळ वाटप करा माजलगावमध्ये रस्ता रोको


माजलगाव , (रिपोर्टर) : शहरासह ग्रामीण भागातील शेकडो निराधारांचे मिळणारे अनुदान येथील पोस्ट ऑफिस च्या हलगर्जीपणा मुळे अजून प्रयन्त मिळाले नसल्याने या वृद्ध व निराधार लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली हे त्यांच्या हक्काचे मानधन तात्काळ वाटप करावे या मागणीसाठी काल भारतीय जनहित काँग्रेस पार्टी व भीम सेना भीम आर्मी चे महाराष्ट्र राज्याचे नेते सलीम बापू यांनी भव्य रस्ता रोको आंदोलन केले.


गोरगरीब वृद्ध निराधारना वेठीस धरणार्‍या माजलगाव पोस्ट ऑफीसच्या निषेधार्थ काल दि.30 रोजी पोस्ट ऑफीस समोर मा.आर. आर. पांडीयन यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन व भव्य निदर्शने करण्यात आले येथील तहसील प्रशासनाने निराधारांचे अनुदान पाठविलेले असतांना पोस्ट ऑफीसच्या हिटलरशाही धोरणामुळे तब्बल आठ महिन्यापासून निराधारांचे अनुदान वाटप करण्यात येत नाहीत. त्या मुळे शेकडो निराधांरावर उपासमारीची व हालाकीचे जीवन जगण्याची वेळ आली आहे.


तरी निराधारांचे अनुदान तात्काळ वाटप करा या मुख्य मागणी साठी भारतीय जनहित काँग्रेस पार्टी व भीम सेना भीम आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लरसेनापती मा.आर.आर.पांडीयन यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र राज्य नेते सलीम बापू यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्या सह काल दि.30 रोजी पोस्ट भव्य निदर्शने व रास्तारोको आंदोलन केले सदरील निवेदन ना वसावे व मंडळधिकारी रुपदे यांनी घेऊन सहा दिवसात मानधन वाटप करण्याचे आश्वासन दिले या वेळी शहर पोलीस स्टेशनचे पी एस आय अविनाश राठोड सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

सलीम बापू यांच्या याआंदोलनाच्या दनक्याची दखल आठ दिवसात सर्व लाभार्थ्यांचे 6 महिन्याचे थकीत मानधन वाटप करण्याचे आश्वासन पोस्ट मास्तर भावसार यांनी सांगितले.

Most Popular

error: Content is protected !!