Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईरस्त्यासाठी शेतकरी कुटुंब बसलं शेतात उपोषणाला

रस्त्यासाठी शेतकरी कुटुंब बसलं शेतात उपोषणाला


तहसीलदारांना शेतकर्‍याकडे लक्ष द्यायला वेळ नाही का?-शेकाप
गेवराई/बीड (रिपोर्टर):- शेतात जाण्यासाठी रस्ता खुला करण्यात यावा या मागणीसाठी गेवराई तालुक्यातील दैठण येथील एक शेतकरी कुटुंब चक्क शेतातच उपोषणाला बसलं आहे. वेळोवेळी रस्त्याची मागणी करूनही तहसील प्रशासन रस्ता उपलब्ध करून देत नसल्याने शेतकर्‍याने शेतामध्ये उपोषण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान तहसीलदार यांना शेतकर्‍यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही का? असा प्रश्‍न शेकापचे अ‍ॅड.नवले यांनी उपस्थित केला आहे.


सोमेश्‍वर पंडित रा.दैठण यांना शेतामध्ये जाण्यास रस्ता नसल्याने त्यांनी रस्त्यासंदर्भात तहसीलदार यांच्याकडे अनेक वेळा निवेदन दिले. मात्र तहसील प्रशासनाने त्यांच्या या निवेदनाकडे गांभीर्याने पाहिले नाही. आज पंडित हे आपल्या कुटुंबासमवेत चक्क शेतामध्ये उपोषणाला बसले आहेत. महसूल विभागाने तात्काळ रस्ता उपलब्ध करून द्यावा नसता उपोषण सोडणार नाही असा आक्रमक पवित्रा सोमेश्‍वर पंडित यांनी घेतला आहे. दरम्यान शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे तहसीलदार यांना लक्ष द्यायला वेळ नाही का? असा प्रश्‍न शेतकरी कामगार पक्षाचे नवले यांनी उपस्थित केला असून शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष न दिल्यास शेकाप रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला.

Most Popular

error: Content is protected !!