Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडतीन दिवसात एसटी महामंडळाचे 53 कर्मचारी निलंबीत

तीन दिवसात एसटी महामंडळाचे 53 कर्मचारी निलंबीत


आंदोलनाचा आजचा 28 वा दिवस; कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम
बीड (रिपोर्टर):- एस महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी कर्मचार्‍यांनी संप पुकारलेला आहे. या संपाबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही. शासनाने 41 टक्के पगारवाढ घोषीत केली असली तरी कर्मचारी विलनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम असून ते आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत. कर्मचार्‍यांनी कामावर रूजू व्हावे असे आवाहन करण्यात आले होते. मात्र कर्मचारी कामावर रूज होत नसल्याचे पाहून त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यास सुरू करण्यात आली. गेल्या तीन दिवसात 53 कर्मचार्‍यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली.


दिवाळीच्या पुर्वीपासून एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी संप पुकारलेला आहे. या संपाबाबत अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. अनिल परब यांनी कर्मचार्‍यांना 41 टक्के पगार वाढ केल्याचे घोषीत केले. मात्र कर्मचारी विलनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरूच आहे. बीड येथील डेपोचे प्रांगणात कर्मचारी ठिय्या मांडून बसलेले आहेत. कर्मचार्‍यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले. मात्र कर्मचारी आंदोलन मागे घेत नसल्याचे पाहून कर्मचार्‍यांवर निलंबनाच्या कार्यवाहीला सुरूवात करण्यात आली. गेल्या तीन दिवसामध्ये बीड ठेपोचे 53 कर्मचारी निलंबीत करण्यात आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!