Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमपरळी औष्णीक विद्युत केंद्रातून राखेचा अवैध उपसा परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा...

परळी औष्णीक विद्युत केंद्रातून राखेचा अवैध उपसा परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


बीड (रिपोर्टर)ः- परळी येथील औष्णीक विघुत केंद्राच्या दाऊदपूर शिवारातील राखेचा तळ्यातील अवैध राख उपसून तिचा सार्वजनीक रस्त्याने अवैध रस्त्याने वाहतूक केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीसात महाराष्ट्र सुरक्षा बल औष्णीक विद्युत केंद्राचे राजाराम बजरंग कांबळे यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालक, मालक आणि ऑपरेटर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी येथील औष्णीक विद्युत केंद्राच्या दाऊदपूर शिवारातील राखेच्या तळ्यातून राख उपसा करु नये असे जिल्हाधिकारी यांनी आदेश देवूनही तेथे सर्रासपणे अवैधरित्या राखेचा उपसा करुन तो टिप्परद्वारे सार्वजनीक रस्त्याने वाहतूक केली जाते. त्यामुळे राख रस्त्यावर सांडत असून मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात महाराष्ट्र सुरक्षा बल औष्णीक विद्युत केंद्राचे राजाराम कांबळे यांनी परळी ग्रामीण पोलीसांना दिलेल्या तक्रारी वरुन मोतीराम बाळासाहेब माने, शेख माजेद शेख अनीस, सोमनाथ हरीभाऊ फड, शाम गंगाधर मुंडे, उमेश गंगाधर मुंडे, विश्‍वाभंर उमाजी राठोड, राम करबा गायके, आकाश दादाराव कांबळे, बिभीषण उत्तम यादव, सुरेश सखाराम हातागळे, आश्रुबा वैजीनाथ सोळंके यांच्यासह इतर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!