Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडजिल्ह्यातील 3 हजार शाळेच्या आज घंटा वाजल्या

जिल्ह्यातील 3 हजार शाळेच्या आज घंटा वाजल्या


शिक्षकांनी मुलांचे पुष्पगुच्छ देवून केले स्वागत;दीड वर्षापासून होत्या शाळा बंद
बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे पहिले ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. आजपासून शाळेला सुरूवात झाली. जिल्ह्यातील 3 हजार 12 शाळेंच्या आज घंटा वाजल्या. शिक्षकांनी मुलांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यापुर्वी पाचवीच्या पुढील वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र पहिले ते चौथी पर्यंतच्या वर्गाला सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली नव्हती. पहिले ते चौथीपर्यंत 1 लाख 38 हजार 91 विद्यार्थी आहेत. तर शहरी भागात पहिले ते सातवी पर्यंतचे 97 हजार 75 विद्यार्थी आहेत.


गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. या संसर्गामुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. दुसरी लाट ओसरल्यानंतर आठवीच्या पुढील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये घेतल्यानंतर आता पहिले ते चौथी पर्यंत शाळा सुरू करण्यात आली. ग्रामीण भागामध्ये पहिले ते चौथीच्या 2 हजार 648 तर शहरी भागात सातवी पर्यंतच्या 364 अशा एकूण 3 हजार 12 शाळा आहेत. या शाळामध्ये पहिले ते चौथीपर्यंत 1 लाख 38 हजार 91 विद्यार्थी आहेत. तर शहरी भागात पहिले ते सातवी पर्यंत 97 हजार 75 विद्यार्थीी आहेत. दीड वर्षानंतर पहिल्यांदाच ग्रामीण भागात पहिले ते चौथी आणि शहरी भागात पहिले ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. शाळा पुन्हा भरल्याने शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांचा किलबीलाट दिसून येवू लागला.

Most Popular

error: Content is protected !!