Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडलोकाहो,दहशतीत राहू नका सतर्क रहा! सोशल मिडियासह ईलेक्ट्रॉनिक माध्यमाचे ओमीक्रॉन सावट

लोकाहो,दहशतीत राहू नका सतर्क रहा! सोशल मिडियासह ईलेक्ट्रॉनिक माध्यमाचे ओमीक्रॉन सावट

लॉकडाऊनच्या भितीने शेतकरी बेभाव
शेती माल विकु लागला; शासन,प्रशासन व्यवस्थेने सर्वसामान्यातील भिती दूर करण्यासाठी प्रबोधन करावं
बीड (रिपोर्टर):- कोरोनाच्या दोन लाटेने उद्धवस्त केलेले जनजीवन कसेबसे सुरळीत होत असतांनाच ओमीक्रॉनचे सावट घोंगावत असल्याच्या भितीदाय बातम्यांनी पुन्हा एकदा दहशतीचे आणि लॉकडाऊन शक्यतेचे वातावरण निर्माण केले जात आहे. सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी या वातावरणात भितीयुक्त होत आहे. या सुरळीत चाललेल्या परिस्थितीला हे सर्वात मोठे गालबोट आहे. त्यामुळे सुरक्षा आणि सतर्कता यावर उद्धबोधन करण्याची जबाबदारी शासन व प्रशासन व्यवस्थेची असल्याने या व्यवस्थेने भितीयुक्त वातावरण दूर करण्यासाठी प्रयत्न करावे आणि दुसरीकडे लॉकडाऊन अथवा ओमीक्रॉनचे सावट हे भितीने नव्हे तर सुरक्षेने आणि जबाबदारीने दूर होईल याची दक्षता सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावी.


कोरोनाच्या दोन लाटा न विसरता येणार्‍या आहेत. या कार्यकाळात झालेलं लॉकडाऊन जनजीवन विस्कळीत करून सोडणारं ठरलं. त्यामुळे आता ताकही फुंकून पिण्याचे काम सर्वसामान्य कष्टकरी शेतकर्‍यांकडून होत आहे. ओमीक्रॉनचे सावट घोंगावत असल्याने राज्य शासनाने उपाय योजना आणि निर्बंधांची गेल्या आठवड्यात घोषणा केली. या घोषणेमुळे आणि वृत्तवाहिन्यातून दाखवण्यात येणार्‍या भितीदायक बातम्यांमुळे सर्वसामान्य सैरावैर होत लॉकडाऊन पडते की काय? या भितीने घरात जमापुंजी जमा करू पाहत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. शेतकरी आपल्या घरातला होता नव्हता तो शेतीमाल बाजारात विक्रीसाठी आणत आहे. शेतकर्‍यांची लॉकडाऊनची भिती लक्षात घेवून व्यापारी शेतकर्‍यांचा शेतीमाल कवडीमोल भावात खरेदी करत आहे. ओमीक्रॉन अथवा कोरोना आपल्या जवळ येवू नये यासाठी नागरिकांनी भितीपेक्षा सतर्कता आणि दक्षता बाळगणे गरजेचे आहे. माध्यमांकडूनही कोरोना अथवा ओमीक्रॉनच्या बातम्या प्रसारीत करतांना दहशत
पसरणार नाही, आपल्या वृत्तामुळे लॉकडाऊनची भिती निर्माण होणार नाही ही दक्षता घेणेही गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाच राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन या व्यवस्थेने ओमीक्रॉन आणि कोरोनाबाबत सकारात्मकदृष्टीकोन ठेवून उपाय योजना आणि नागरिकांच्या सतर्कते बाबत उद्धबोधन करणे गरजेचे आहे. शासन प्रशासन व्यवस्थेकडून हे उद्धबोधन होत नसल्याने सोशल मिडियासह ईलेक्ट्रॉनिक माध्यमातील बातम्यांमुळे सर्वसामान्यात लॉकडाऊनची भिती निर्माण होत आहे. ती भिती दूर करण्याची जबाबदारी प्रशासन व्यवस्थेची आहे.


दंडाची भाषा नको,लोकजागरण हवं!
ओमीक्रॉनच्यया अनुषंगाने लसीकरणासह अन्य बाबींसाठी राज्य शासन थेट दंडाची भूमिका घेत असल्याने या भितीमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. मास्क न घातल्यास आमुक-आमुक दंड, लसीकरण न केल्यास आमुक-आमुक दंड या सर्व गोष्टीमुळे पुन्हा लॉकडाऊन लागते की काय? ही भिती सर्व सामान्यात आहे. त्याचा फायदा अन्य बाजारू लोक घेत असून त्या लोकांना साजेसे वातावरण निर्माण करण्यात सोशल मिडिया आणि ईलेक्ट्रॉनिक माध्यम मदत करत आहे. म्हणून शासन प्रशासन व्यवस्थेने दंडाच्या भाषेपेक्षा लोक जागरणावर काम करावे.

Most Popular

error: Content is protected !!