Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडआष्टीआष्टी तालुक्यात 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण सकाळपासून पावसाची संततधार जनजीवन गारठले

आष्टी तालुक्यात 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण सकाळपासून पावसाची संततधार जनजीवन गारठले


आष्टी (रिपोर्टर) :- तालुक्यात 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.रात्री 1 च्या दरम्यान पावसाला सुरूवात झाली असून सकाळपासून च पावसाची संततधार सुरू आहे.ढगाळ वातावरणामुळे आज सुर्यनारायणाचे दर्शन झाले नाही.ऐन हिवाळ्यात पावसाने अवेळी लावलेल्या हजेरीमुळे हवेत गारठा वाढल्याने जनजीवन गारठले आहे.


तालुक्यात मागिल 3 ते 4 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने विविध भागांत पावसाने हजेरी लावली आहे.गुरुवारच्या मध्यरात्री 1 च्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली मागिल 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू असल्याने नोकरदारांची कामावर जाणा-या सकाळी चांगलीच तारांबळ उडाली,वाहतुक देखील रेंगाळलेली पाहायला मिळाली,ऐन हिवाळ्यात पावसाने हवेतील गारठा वाढल्याने आष्टीकरांना थंडीचा कडाका सहन करावा लागत आहे.या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला असून शेतपिकं, फळबागांचे नुकसान झाले आहे. या संकटामुळे शेतकर्‍यांची चिंता आणखी वाढली आहे.डोंगर दर्‍या दाट धुक्यांनी लेपाटून गेल्या आहे तर सर्वत्र पावसाळी वातावरण असल्याने जनजीवन गारठून गेले आहे. या हिवाळ्यात प्रथमच नागरिकांना हिटर आणि शेकोट्या पेटवाव्या लागल्या आहेत.मागे अवकाळी पाऊस झाला त्याने नुकसान केलेच शिवाय रोगाचा प्रादुर्भावही वाढला. शेतकरी मेटाकुटीला आला आणि शेतकर्‍यांनी फवारणी करुन पिक सुधरवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती सुधारेल असे कुठे वाटत असताना पुन्हा झालेल्या या पावसामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला.ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराई चे प्रमाण वाढले आहे.

Most Popular

error: Content is protected !!