Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडतीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या

तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या


गेवराई (रिपोर्टर)- तीन वर्षापासून पोलिसांना हुलकावणी देणार्‍या आरोपीच्या गेवराई पोलिसांनी मुसक्या बांधल्या असून पुढील कारवाईसाठी त्याला बीड ग्रामीर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.


भदर्‍या मोहन भोसले (वय 45, रा. आहेर वाहेगाव) ता. गेवराई याच्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 335/2019 कलम 457, 380, 379 भा.दं.वि. नुसार गुन्हा दाखल होता. मात्र तेव्हापासून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. गेवराई पोलिसांनी कोब्बिंग ऑपरेशन दरम्यान त्याच्या राहत्या घरून त्याला ताब्यात गेतले. सदरील कारवाई गेवराईचे डीबी पथकप्रमुख स.पोनि. प्रफुल्ल साबळे, पो.हे.कॉ. देशमुख, पो.ना. जायभाये, पो.शि. राठोड यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!