Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईममाजलगावच्या भाटवडगावात सशस्त्र दरोडा, शिंदे कुटुंबियांना मारहाण करत अडीच लाखांचा ऐवज लुटला

माजलगावच्या भाटवडगावात सशस्त्र दरोडा, शिंदे कुटुंबियांना मारहाण करत अडीच लाखांचा ऐवज लुटला

हिलेच्या गळ्यावर चाकु लावला
कानातलं झुंबर ओरबाडलं
,
महिलेचा कान तुटला, पतीलाही काठीने बेदम मारहाण, तालुक्यात भीतीचे वातावरण


माजलगाव (रिपोर्टर)- माजलगाव शहरासह परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना घडत असून मध्यरात्री माजलगाव शहरानजीक असलेल्या भाटवडगाव येथील शिक्षक कॉलनी भागात राहणार्‍या लक्ष्मण शिंदे यांच्या निवासस्थानी सहा दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवत दाम्पत्यास मारहाण करत मोठी लूट केली. महिलेच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेले. कानातील झुंबर निघत नसल्याचे पाहून ते हिसकावल्याने महिलेचा कान कापला गेला. नगदी रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने मिळून तब्बल दोन लाख 47 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने माजलगाव परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण जाले असून घटनास्थळी श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे तर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. सहाही दरोडेखोर वीस ते पंचेवीस वयोगटातील असल्याचे शिंदे कुटुंबियांनी सांगितले.
याबाबत अधिक असे की, माजलगाव शहरा-नजीक असलेल्या नवीन शिक्षक कॉलनी, भाटवडगाव येथे लक्ष्मणराव शिंदे हे आपल्या कुटुंबिया-समवेत राहतात. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मणराव शिंदे त्यांच्या पत्नी संजीवनी शिंदे यांनी मुलगा राजेश कामावरून आल्यानंतर घराच्या मेन गेटला कुलूप लावले आणि हे सर्व कुटुंब घरात झोपले. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हॉलच्या चॅनल गेटकडील दरवाजा कोणीतरी ढकलत असल्याचा आवाज आल्यामुळे संजीवनी आणि लक्ष्मण शिंदे हे दाम्पत्य तिकडे गेले तेव्हा हॉलच्या दरवाज्याची आतील कडी उघडलेली दिसली. हॉलमध्ये 20 ते 25 वयोगटातील सडपातळ बांध्याचे काळी शर्ट आणि पँट घातलेले सहा दरोखोर दिसले. हातात काठी, बॅटरी, चाकू होता, आम्हाला पाहताच त्यांनी ‘चुप बैठो’, असे म्हणत काठीने मारहाण करायला सुरुवात केली. संजीवनी शिंदे यांच्या गळ्याला चाकू लावला तर लक्ष्मण शिंदेंच्या जवळ एक दरोखोर थांबला. घरातील कपाटामधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रोकड लुटली. त्याचबरोबर संजीवनी यांच्या गळ्यातील सोने ओरबाडले. कानातील झुंबर लवकर निघत नसल्याचे पाहून दरोडेखोरांनी ते हिसकावले. त्यामुळे संजीवनी यांचा कान तुटला. दरोडेखोरांनी नगदी आठ हजार रुपयांच्या रोकडसह दोन लाख 47 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटले आणि घटनास्थळावरून ते पळाले. त्यानंतर शिंदे दाम्पत्यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांची मुले व सर्वजण जागे झाले. घटनेची माहिती माजलगाव पोलिसांना देण्यात आली असून या प्रकरणाची तक्रार संजीवनी लक्ष्मण शिंदे यांनी दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गु.र.नं. 378/2021 कलम 395, 457, 342 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.निरीक्षक डी.आर. फराटे हे करत आहेत. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी भेटी दिल्या असून श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले. या दरोड्याच्या घटनेने माजलगाव तालुक्यात दहातीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!