Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडकोंबड्याचे खत घेवून जाणारा ट्रक मांजरसुंबा घाटात पलटला

कोंबड्याचे खत घेवून जाणारा ट्रक मांजरसुंबा घाटात पलटला


दोघे जण जखमी; महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प
नेकनूर (रिपोर्टर):- हैद्राबादहून औरंगाबादकडे कोंबड्याचे खत घेवून जाणारा ट्रक मांजरसुंब्याच्या घाटात रात्री पलटी झाला. या अपघातात चालक आणि क्लिनर जखमी झाले. ट्रक रस्त्यावर आडवा पडल्याने महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
काल रात्री ट्रक क्र.एपी 39 पीसी 6579 ही गाडी हैद्राबादहून औरंगाबादकडे कोंबड्याचे खत घेवून जात होती. मांजरसुंब्याच्या घाटात चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली. यामध्ये चालक आणि क्लिनर दोघे जखमी झाले. गाडी रस्त्यावर पलटी झाल्यामुळे महामार्गवरील वाहतुक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती महामार्ग पोलीसांना झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बांगर, पोलीस उपनिरीक्षक घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बबन राठोड, शेख फारोक, तात्या बांगर, शेख अल्ताफ, अनिल तांदळे यांनी घटनास्थळी जावून वाहतुक सुरळीत केली. दरम्यान ट्रक चालक दारू पिलेला होता त्यामुळे या ट्रकचा अपघात झाला असल्याचे सांगण्यात आले.

Most Popular

error: Content is protected !!