Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडमुलीस पळवून नेल्या प्रकरणी तरुणावर बलात्काराचा गुन्हा, सहा दिवसाची पोलीस कोठडी

मुलीस पळवून नेल्या प्रकरणी तरुणावर बलात्काराचा गुन्हा, सहा दिवसाची पोलीस कोठडी


खुंड्रस येथे घडली होती घटना
कुक्कडगांव (रिपोर्टर)ः- पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 24 वर्षीय तरुणांने अल्पवयीन मुलीस पळवून नेले होते. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला होता. परवा मुलांसह मुलगी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले होते. या प्रकरणी पोलीसांनी तरुणाच्या विरोधात 376 व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.


गेल्या काही दिवसापूर्वी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुंड्रस येथील रविंद्र मिसाळ या 24 वर्षीय मुलाने गावातीलच अल्पवयीन मुलीस पळवून नेले होते. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला होता. परवा सदरील तरुण मुलीसह पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला. या प्रकरणी त्याच्या विरोधात कलम 376 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास पिंपळनेर ठाण्याचे प्रमुख आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय सानप, औचार हे करत आहे.

Most Popular

error: Content is protected !!