Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडमानकूरवाडीत घरफोडी नगदी रकमेसह दागिने लंपास

मानकूरवाडीत घरफोडी नगदी रकमेसह दागिने लंपास


बीड (रिपोर्टर) पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानकूरवाडी येथे पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत घरातील नगदी रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

सखाराम बापू शेलार हे मानकूरवाडी येथे आपल्या कुटुंबियासह राहतात. रात्री जेवण करून परिवारासोबत झोपले असता अज्ञात चोरट्यांनी पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेल्या नगदी रकमेसह सोन्याचे दागिने लंपास केले. सकाळी आपल्या घरी चोरी झाल्याचे शेलार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पिंपळनेर पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आघाव, रामप्रसाद कडुळे, वनवे, बिट अमलदार सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी दुपारी उशिरापर्यंत चोरट्यां-विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!