Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमअंबाजोगाईत घरफोडी; सत्तेचाळीस हजाराचा मुद्देमाल लंपास

अंबाजोगाईत घरफोडी; सत्तेचाळीस हजाराचा मुद्देमाल लंपास


अंबाजोगाई(रिपोर्टर):
घराला कुलूप लावून सर्व कुटूंब बाहेर गेले असता अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या दागिण्यासह नगदी असा एकूण 47 हजार 185 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील रामकृष्ण नगर पोखरी रोडवर घडली.


अंबाजोगाई शहरातील पोखरी रोडवर राहणारे सुरज भिमराव गायकवाड हे काल दि. 2 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 11.30 च्या दरम्यान घराबाहेर गेले होते. यावेळीच भर दिवसा अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे आणि नगदी ऐवज लंपास केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!