Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईसंपकर्‍यांनो, कामावर या नसता ‘मेस्मा’ लावू अनिल परब यांचा निर्वाणीचा इशारा, घसघशीत...

संपकर्‍यांनो, कामावर या नसता ‘मेस्मा’ लावू अनिल परब यांचा निर्वाणीचा इशारा, घसघशीत पगारवाढ दिली, विलिनीकरणासाठी समितीही नेमली

मुंबई, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण विभागात 15 हजार कर्मचारी कामावर
मुंबई (रिपोर्टर)- एसटीच्या इतिहासात कधी मिळाली नसेल एवढी म्हणजे 41 टक्के सरकारने पगारवाढ दिली. यामुळे 10 वर्षे ते 30 वर्षे सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांना 24 हजार ते 56 हजार रुपये वेतन मिळणार आहे. त्याचप्रमाणे न्यायालयाच्या आधीन राहून नियुक्त समितीच्या शिफारशीनुसार विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे संप तात्काळ मागे घ्यावा, असे आवाहन करत परिवहन मंत्री अनिल परब यांनी ‘मेस्मा’ लावण्याचा निर्वाणीचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.


परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचार्‍यांच्या संपाबाबत इत्यंभूत माहिती देताना आजपर्यंत कधीही एसटी कर्मचार्‍यांच्या पगारात जेवढी वाढ झाली नाही तेवढी वाढ या संपानंतर केली आहे. ज्या कर्मचार्‍यांचा कार्यकाळ दहा ते बारा वर्षापर्यंतचा आहे अशा चालकांचे पगार कमी आहे, असे आमचे मत झाले. त्यामुळे त्यांचे पगार 18 हजार होते. यामधील बेसिक 12 हजार अणि इतर भत्ते, परंतु कर्जाचे हप्ते, सोसायटीचे हप्ते कापून त्यांच्या हातात 10 ते 12 हजार रुपये येत असत. जसा 18 हजार पगार घेणारा कर्मचारी आहे तसा 50 हजार घेणाराही आहे, परंतु लोकांसमोर जे चित्र मांडलं जातं ते पाच-सहा हजाराचं. एसटीत दोन गटामध्ये पगारी आहेत. ज्यांचे पगार कमी आहेत त्यांच्या मुळ पगारात घसघशीत वाढ करण्याचा आम्ही निर्णय घेतला. ज्या चालकाला 10 वर्षे पुर्ण झाली त्याचा पगार 17 हजार 395 होता या कर्मचार्‍यांच्या बेसिकमध्ये आम्ही 5 हजाराची वाढ केली आहे. त्याच्या डीए, एचआरएच मध्ये वाढ झाली त्यामुळे त्याचा पगार 24 हजार 595 रुपये एवढा झालाय. ही वाढ पाहता ती 41 टक्क्यांची होती. असे पगारवाढीचे आकडे देत अनिल परब यांनी वस्तुस्थिती मांडली, परंतु कर्मचारी अद्यापही कामावर येत नाहीत. त्यामुळे निलंबणाचं पाऊल उचलावं लागलं. मुंबई, कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र विभागात 15 हजारपेक्षा जास्त कर्मचारी सेवेत दाखल झाले. विदर्भ, मराठवाडा या भागात कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. वरिष्ठ अधिकारी त्यांच्याशी बोलणे करत आहेत. परंतु हे कर्मचारी विलिनीकरणावर ठाम आहेत. आता आम्ही थांबणार नाहीत. येत्या दोन-तीन दिवसात संपकर्‍यांवर ‘मेस्मा’ लावण्याची आमची तयारी आहे. तशी चर्चा आम्ही करत आहोत. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. कर्मचार्‍यांनी कामावर परतावं नसता इच्छा नसताना मेस्माची कारवाई करावी लागेल, असे अनिल परब यांनी म्हटले.

Most Popular

error: Content is protected !!