Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडसंपर्कप्रमुख आनंद जाधवांच्या जिल्हा दौर्‍याने सैनिकात नवचैतन्य पाचही नगरपंचायतींसाठी शिवसेनेची भूमिका महत्वाची

संपर्कप्रमुख आनंद जाधवांच्या जिल्हा दौर्‍याने सैनिकात नवचैतन्य पाचही नगरपंचायतींसाठी शिवसेनेची भूमिका महत्वाची


बीड (रिपोर्टर)- शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव यांच्या बीड जिल्हा दौर्‍याने शिवसैनिकात नवचैतन्य संचारला असून आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी, केज नगर-पंचायतीसाठी शिवसैनिकांच्या बैठकांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आघाडीसाठी सन्मानाने शिवसेनेला सोबत घेतले तर ठिक नसता बाळासाहेबांचा शिवसैनिक स्वतंत्र लढा द्यायला तयार असल्याचे सांगत शिवसैनिकांनी या पाचही नगरपंचायत निवडणुकीत साम-दाम-दंडाने लढावं, असं म्हणत आनंद जाधवांनी जिल्ह्याची शिवसेना चार्ज केली.


गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंद जाधव हे बीड जिल्ह्यात डेरेदाखल आहेत. आष्टी, पाटोदा, शिरूर नगरपंचायत निवडणुकीसाठी बैठका लावल्यानंतर या बैठकांना शिवसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून राज्यातील सर्व नगरपंचायत निवडणूक लढणार असल्याचे सांगून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून नगरपंचायतींना निधी उपलब्ध करून विकास करणार असल्याचे म्हटले. शिवसैनिक हा लोकप्रतिनिधी झाला पाहिजे. हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न असायचं. शिवसेना प्रमुखांनी रडायला नाही तर लढायला शिकवलं. निवडणुकांमध्ये भगवा कसा फडकवायचा हे शिवसैनिकांना चांगलं माहित आहे, असं म्हणत शिवसेनेचे गतवैभव निर्माण करण्यासाठी तन-मन-धनाने लढा, असे आवाहन या वेळी ठिकठिकाणी आनंद जाधव यांनी केले. आघाडीसाठी कोणाच्या दारात जाणार नाही, सन्मानाने जागा दिल्या तर आम्ही स्वीकार करू आणि महाविकास आघाडी विजयी करण्यासाठी प्रयत्न करू, असं म्हणत आनंद जाधव यांनी केज, वडवणी नगरपंचायतीसाठीही शिवसैनिकांच्या बैठका घेतल्या. आनंद जाधव यांच्या चैतन्य भरणार्‍या बैठकांनी शिवसैनिक पुर्णत: चार्ज झाला असल्याने या पाचही निवडणुकीत शिवसेनेची भूमिका महत्वाची ठरणार आहे. या बैठकांसाठी आनंद जाधव यांच्या सोबत सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे, जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव, संघटक संगीता चव्हाण, उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, भाऊसाहेब लटपटे, भाई संजय महाद्वार, राहुल चौरे, कुमार शेळके, रत्नाकर शिंदे, संदीप माने, नागेश दिघेंसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!