बीड शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 38 पेक्षा जास्त आमदारांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्याने राज्यभरातला शिवसैनिक संतापून उठला आहे. गेल्या सात दिवसांच्या कालखंडात राज्य पातळीवर सरकार आणि शिवसेना वाचविण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. मात्र शिवसैनिकांनी आता आक्रमक पावित्रा घेत बंडखोर आमदारांविरोधात आंदोलन सुरू केले आहे. बीड जिल्ह्यात याचे लोण पोहचले असून बीड शहरासह धारूर, केज, परळी, अंबाजोगाई, माजलगाव, आष्टी, वडवणी या ठिकाणी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले.
बीडच्या साठे चौकात शिवसैनिकांची प्रचंड घोषणाबाजी
बीड (रिपोर्टर) ‘उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘या गद्दारांचे करायचे काय, खाली मुंडके वरी पाय’ अशा घोषणा देत बीडचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले. शहरातल्या साठे चौकात बंडखोर आमदारांविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलन केले. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.
एकनाथ शिंदेंसह शिवसेनेतील 38 आमदारांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारले. या बंडाचा आज सातवा दिवस आहे. शिवसेनेविरुद्ध बंड पुकारलेल्या आमदारांविरुद्ध राज्यभरातील शिवसैनिकात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. हे लोण आता बीड जिल्ह्यात येऊन पोहचले असून बीड शहरात जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वात साठे चौकात बंडखोर आमदारांविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.
या वेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे,किसान सेना जिल्हा संघटक परमेश्वर सातपुते,शिवसेना उप जिल्हाप्रमुख हनुमंत जगताप,हनुमान पिंगळे,सुशील पिंगळे,आशिष मस्के,उप सभापती मकरंद उबाळे,जिल्हा संघटक बप्पासाहेब घुगे,नितीन धांडे,शिवसेना तालुका प्रमुख गोरख सिंघण,माजी सभापती सुनिल अनभुले,माजी जि.प.सदस्य किशोर जगताप,शिवसेना शहरप्रमुख सुनिल सुरवसे,रतन गुजर, माजी पं.स.सदस्य.दीपक काळे,उप तालुका प्रमुख छगन काळे,सखाराम देवकर,सर्जेराव तात्या शिंदे,सरपंच प्रदीप माने,उप सरपंच प्रदीप कोटुले,युवासेना तालुका अधिकारी जगदीश उबाळे,उप जिल्हाअधिकारी अजिंक्य पवळ,प्रदीप जोगदंड,बंडू कापले,नवनाथ शिंदे,बंटी धनवे,शुभम कातांगले,उप शहर प्रमुख,कामरान शेख,हनुमान पांडे,आंगद कापले,सदाशिव सुर्वे,हुसेन शेख,सरपंच रामहरी हाडूळे,सरपंच अंकुश गायकवाड,कल्याण कवचट,काकासाहेब जाधव,ठाकूर लक्ष्मण सिह,कृष्णा वायभाट,औदुंबर थोरात,गणेश टिपले,संतोष राऊत,माजी नगरसेवक बाबा पांढरे,रामसिंग टाक,मुकुंद भालेकर,मशारू पठाण,ज्ञानेश्वर शिंदे,गणेश उगले,साहेबराव पोपळे,राहुल नांनवरे,राहुल कदम,पिंटू भांडवले,सुधीर कारगुदे, गोविंद लहाने,मधुकर शिंदे,अनिल माने,अमोल गवळी,रोहित चौरे, नामदेव म्हेत्रे,नामदेव वांधरे,रोहन शेख,कृष्णा सुर्वे,भैय्या कदम, सुरेश माने, मधुकर शिंदे, नंदू येवले,आबा घोडके,आबासाहेब आगलावे, विजय जगताप, आकाश जगतापांसह आदी शिवसैनिक उपस्थित होते.
किल्ले धारुर – शिवसैनिक रस्त्यावर
किल्ले धारुर (रिपोर्टर) महाराष्ट्र मंत्री मंडळातील शिव सेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरुध्द बंड करुन काही आमदारांना फुस लावुन बंडखोरी केलेल्या आमदारांच्या विरोधात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करुन मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे यांना समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख मा.श्री.उध्दवजी ठाकरे यांच्या विरुध्द बंडखोरी करणारे आमदार यांच्या विरोधात मराठवाडा संपर्क नेते,मा.खा.चंद्रकांतजी खैरे,बीड जिल्हा संपर्क प्रमुख आनंदजी जाधव ,सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे यांच्या आदेशावरुन बीड जिल्हाप्रमुख मा.आप्पासाहेब जाधव साहेब,माजलगाव मतदार संघाचे संपर्क प्रमुख विजयजी सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख नारायण कुरुंद यांच्या नेतृत्वाखाली निषेध करुन निदर्शने करण्यात आले तसेच पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री .उध्दवजी ठाकरे यांना समर्थन करण्यात आले यावेळी मा.तालुका प्रमुख विनायक ढगे,उपतालुका प्रमुख बंडु बप्पा सावंत,तालुका संघटक राजकुमार शेटे,तालुका सचिव बाबा सराफ उपशहर प्रमुख नितीन सद्दिवाल- सुनिल भांबरे,गणेश पवार,राधेशाम रहेकवाल,बालाजी शिंदे,सुधीर आप्पा गुळवे,संजृय पंडीत,नितीन राऊत,आमर महामुनी,धिरज चिंचाळकर,विष्णु फुन्ने,विक्रम शिंदे,आशोक (पान 7 वर)
शेंडगे,ज्ञानेश्वर शेंडगे,गोरख सावंतदिलीप पंडीत ,किरण कांबळे,आलिम सय्यद,आघाव,शेख आवेज,सय्यद रियाज,शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते.