Monday, January 24, 2022
No menu items!
Homeराजकारणकेज नगर पंचायतमध्ये चौरंगी लढत होणार

केज नगर पंचायतमध्ये चौरंगी लढत होणार


कॉंग्रेस, राष्ट्रवादी, जनविकास आघाडीचे स्वतंत्र पॅनल पडणार? शिवसेना, भाजपात अद्यापही ताळमेळ नाही
केज(रिपोर्टर)ः- केज नगर पंचायतीसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होत असल्याने शहरात चांगलेच वातावरण तापले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ७ डिसेंबर शेवटची आहे. आतापर्यंत फक्त दोघांनी अर्ज दाखल केले असले तरी खर्‍या अर्थाने उद्यापासून अर्ज दाखल होतील. या निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, जनविकास आघाडी यांचे स्वतंत्र पॅनल पडणार असून शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षाचे वेगळे पॅनल राहतील अशी चर्चा होत आहे. या दोन्ही पक्षाने अद्याप मात्र कुठलीही (पान ७ वर)
ठोस भूमीका घेतली नसल्याने भाजप, शिवसेनेला काही ठिकाणी उमेदवार शोधण्याची वेळ येईल असेही बोलले जात आहे.
नगर पंचायत निवडणुकीमध्ये चांगलीच रस्सीखेच होणार असल्याचे दिसते. या नगर पंचायतीवर पाच वर्ष कॉंग्रेसची सत्ता होती. पुन्हा आपली सत्ता राखण्यासाठी खा.रजनीताई पाटील या प्रयत्न करत आहे. कॉंग्रेस पक्षाचा वेगळा पॅनल निवडणुकीत उतरणार आहे. कॉंग्रेसने अद्यापपर्यंत कुठल्याही इतर पक्षाशी आघाडी केलेली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी स्वतंत्र लढेल असं दिसतं. जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी निवडणुका होणार आहे. तिसरे पॅनल हारुण ईनामदार याचं पडणार असल्याचे बोललं जातं. इनामदार यांनी जनविकास आघाडी स्थापन केली. या आघाडीमध्ये कोण कोण सहभागी होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शिवसेना आणि भाजपाने आपली भूमीका अजून समोर आणलेली नाही. हे दोन्ही पक्ष वेगळं लढतेल असं आजच्या परिस्थितीवरुन दिसतं आहे. काही ठिकाणी या दोन्ही पक्षाला उमेदवार शोधण्याची वेळ येईल असही बोललं जातं आहे. या निवडणुकीमध्ये तिरंगी, चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ७ डिसेंबर शेवटची तारीख आहे. आतापर्यंत दोघां जणांनी अर्ज दाखल केलेले आहे. उद्यापासून अर्ज दाखल करण्याच्या प्रकियेला वेग येईल. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यात येत आहे.

उमेदवार निश्‍चित नाहीत
शहरामध्ये कॉंग्रेस पक्षाचं वर्चस्व असल्याने जो तो कॉंग्रेस पक्षाकडे तिकिट मागण्यासाठी पुढे आहे, मात्र पक्षश्रेष्ठी कोणाला तिकिट देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कॉंग्रेस पक्षाने अद्यापही आपले उमेदवार घोषीत केले नाही तर दुसरीकडे राष्ट्रवादी, हारुण इनामदार यांची आघाडी व इतर पक्षांनीही आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. उमेदवार जाहीर झाल्यानंतर खर्‍या अर्थाने निवडणुकीत रंगत येणार आहे.

Most Popular

error: Content is protected !!