Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडथोरल्या क्षीरसागरांच्या होम पिचवर संदीप क्षीरसागरांचा षटकार उद्या वैजिनाथ तांदळेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

थोरल्या क्षीरसागरांच्या होम पिचवर संदीप क्षीरसागरांचा षटकार उद्या वैजिनाथ तांदळेंचा राष्ट्रवादीत प्रवेश


बीड (रिपोर्टर)- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे वैजिनाथ तांदळे यांनी थोरल्या क्षीरसागरांची साथ सोडत हातात आ. संदीप क्षीरसागरांच्या नेतृत्वाची घडी बांधण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेसह माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांना आपल्या होम पिचवर जबरदस्त धक्का बसला आहे. उद्या वैजिनाथ तांदळे राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.


शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या होम पिचवर आ. संदीप क्षीरसागरांनी षटकार लगावला. राजूरी परिसरामध्ये थेट जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत संदीप क्षीरसागरांसमोर शिवसेनेकडून निवडणूक लढवणारे वैजिनाथ तांदळे यांनी माजी मंत्री क्षीरसागरांना राम राम ठोकत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. राजूरी जिल्हा परिषद गटामध्ये वैजिनाथ तांदळे यांची ताकत आहे. माजी मंत्री क्षीरसागर यांच्या मतात भर टाकण्यास सदैव प्रयत्नशील असणारे वैजिनाथ तांदळेंनी थोरल्या क्षीरसागरांची साथ सोडल्याने क्षीरसागरांना जबरदस्त फटका बसणार आहे. वंजारवाडीचे सरपंच म्हणून त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून काम पाहिले असून ते सध्या शिवसेनेचे सचिव आहेत. उद्या राष्ट्रवादी भवनामध्ये वैजिनाथ तांदळे हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह परिसरातील काही सरपंचांसमवेत आ. संदीप क्षीरसागरांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार आहेत.

Most Popular

error: Content is protected !!