Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडमाजलगावमाजलगाव तालुक्यात ऊस असताना बाहेरचा ऊस आणण्याचा घाट का? 5 डिसेंबरला सोमठाणा...

माजलगाव तालुक्यात ऊस असताना बाहेरचा ऊस आणण्याचा घाट का? 5 डिसेंबरला सोमठाणा पुलाजवळ बाहेरच्या गाड्या अडवणार -थावरे


तिन्ही कारखाने बाहेरचा ऊस आणू लागले

माजलगाव/बीड (रिपोर्टर)- माजलगाव तालुक्यातील तिन्ही कारखाने बाहेरचा ऊस आणून गाळप करत आहे. आधी या कारखान्यांनी स्थानिक ऊस गाळप करावा, अशी मागणी गंगाभीषण थावरे यांनी केली असून बाहेरचा ऊस आणणे बंद न केल्यास 5 डिसेंबर रोजी सोमठाणा गंगेच्या पुलाजवळ गाड्या अडवून आंदोलन करणार असल्याचे गंगाभीषण थावरे यांनी म्हटले आहे.

माजलगाव तालुक्यात उसाची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. या तालुक्यात तीन कारखाने आहेत. या तीन कारखान्यांनी आधी तालुक्यातील ऊसाचे गाळप करावे व नंतर बाहेरचा ऊस आणावा, असे न करता कारखाने सर्रासपणे बाहेरचा ऊस आणत असल्याने स्थानिकचा ऊस तसाच राहू लागला. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होऊ लागले आहे. 5 डिसेंबर रोजी सोमठाणा गंगेच्या पुलाजवळ बाहेरच्या येणार्‍या उसाच्या गाड्या अडवून आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघर्ष समितीचे भाई गंगाभीषण थावरे यांनी म्हटले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!