Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडएसटी अधिकार्‍यांकडफन बसेस सुरु करण्याचा प्रयत्न, मंडप काढला तरी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरुच

एसटी अधिकार्‍यांकडफन बसेस सुरु करण्याचा प्रयत्न, मंडप काढला तरी कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरुच


बीड (रिपोर्टर)ः- एस.टी. कर्मचार्‍यांच्या आंदोलकांचा काल पेंडाल काढण्यात आला आहे. यामुळे कर्मचार्‍यात अधिकच संताप व्यक्त होत होता. कर्मचार्‍यांनी महामंडळाच्या प्रांगणात खुल्या प्रांगणात आंदोलन सुरू केले. कर्मचारी थंडीत रात्रभर आंदोलन स्थळी होते. या आंदोलनात महिलासह लहान मुलांचा सहभाग होता.


एस.टी.महामंडळाचे कर्मचारी विलगीकरणावर ठाम असल्याने कर्मचारी आणि राज्यशासन यांच्यात समन्वय होत नसल्याचे दिसून येत आहे. कर्मचार्‍यांने आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन शासनाने वेळोवेळी केले. मात्र याबाबत कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहे. काल बीड एस.टी.महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे पेंडाल काढण्यात आल्याने कर्मचार्‍यात अधिकच संताप व्यक्त होत होता. पेंडाल काढला तरी कर्मचारी मोकळ्या पटागणांत आंदोलनाला बसले.रात्रभर कर्मचारी आदोंलन स्थळी होते. यात महिलासह लहान मुलांचाही समावेश होता.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!