Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईबीड शिवसेना जिल्हाप्रमुख पदाच्या ‘युद्धात’ गेवराईचीच ‘जीत’ होण्याची शक्यता!

बीड शिवसेना जिल्हाप्रमुख पदाच्या ‘युद्धात’ गेवराईचीच ‘जीत’ होण्याची शक्यता!


जिल्ह्यात बदामराव पंडितांची लोकप्रियता अन युध्दाजित पंडितांच्या अनुभवाचा पक्षाला होऊ शकतो फायदा
गेवराई (रिपोर्टर) गेवराई – शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे यांच्या पदाला शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्यानंतर या पदावर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी लोकप्रतिनिधींसह पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडे लॉबिंग करायला सुरुवात केली होती. अनेकजण आपआपल्या पद्धतीने शिवसेनेतील पदाधिकार्‍यांच्या भेटी घेऊन बीडचे जिल्हाप्रमुख पद पदरी पाडण्याचे मनसुबे आखत होते. परंतु शिवसेनेने या वेळेस मात्र बीड जिल्हाप्रमुखाची निवड करण्यासाठी अनेक अपेक्षा ठेवल्या असून तो पारदर्शक असावा, कर्तृत्व चांगलं असावं, दांडगा जनसंपर्क, शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी झटून काम करावं, याचबरोबर शिक्षणाची पात्रताही या वेळेस लक्षात घेतली जात आहे. मात्र या निवडीसाठी जिल्ह्यात मोठी ताकद असणारे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी अनेक नावाच्या शिफारसी केल्यानंतर दत्तरखुद्द पक्ष श्रेष्ठी आणि सामान्य कार्यकर्त्यातून पुढं आलेलं साजेसं नाव म्हणजे युध्दाजित पंडित हे असून याच नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याने बीड जिल्हाप्रमुख पदाच्या या युध्दात गेवराईचीच जीत होणार आसल्याची शक्यता नाकारता येत नाही.
बीड जिल्हा शिवसेना प्रमुख पद स्थगिती देऊन बराच काळ लोटला आहे.


नवा जिल्हाप्रमुख कोण याची उत्सुकता ताणलेली असून या शर्यतीत अनेक नावे पुढे येत असताना शिवसेनेने मात्र बीडच्या जिल्हाप्रमुख पदाबाबत सस्पेन्स कायम ठेवले आहेत. दुसरीकडे या सर्व घडामोडींवर दस्तुरखुद्द युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे लक्ष ठेवून आसून अनेक नावे पुढे येऊन गेल्यानंतरही शिवसेनेनं कुठल्या नावाला पसंती दिली हे स्पष्ट नसले तरी माजी राज्यमंत्री लोकनेते बदामराव पंडित यांच्या सानिध्यात तयार झालेले चरित्र संपन्न युवा नेतृत्व युधाजित पंडीत हे या पदासाठी अत्यंत लायक नेतृत्व असल्याने त्यांचे नाव पुढे येत आहे. युध्दाजित पंडित हे सुरुवातीला या स्पर्धेत नव्हते, मात्र बीड येथील गटबाजी, जुन्या नव्या शिवसिनिकांचा वाद, संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत झालेले आरोप प्रत्यारोप, उपजिल्हाप्रमुखावर झालेला हल्ला या सर्व तक्रारींची गोळाबेरीज बघता पक्षाकडून या कुठल्याच वादात न पडता बदामराव पंडित आणि युध्दाजित पंडित यांनी गेल्या अनेकवर्षांपासून शिवसेनेसाठी केलेल्या कामाची दखल, तसेच बदामराव पंडित यांची जिल्ह्यातील लोकप्रियता व युध्दाजित पंडित यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेले कार्य, अर्थ व बांधकाम आणि कृषी व पशुसंवर्धन या दोन विभागाचे दोन वेळेस जिल्हा परिषदेचे सभापती या पदावर राहून जिल्हा भरात निर्माण केलेली ताकद तसेच अनेक वर्षापासून शिवसेनेचे जिल्हा समन्वयक म्हणून केलेलं काम पाहता जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक परिस्थितीचा त्यांना दांडगा अभ्यास आणि अनुभव असल्याचं दिसून येत आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड केल्यास गटबाजी न होता, जिल्ह्यातील सर्वच शिवसैनिक व पदाधिकारी एकत्र येतील. त्यामुळे निश्चितपणे येणार्‍या काळात शिवसेना अधिक मजबूत होऊन शिवसैनिक आपली राजकीय ताकद दाखवून देण्यास सक्षम होतील. तसेच प्रामाणिक आणि कट्टर असलेल्या शिवसैनिकांना राजकीय पाठबळ मिळवून सत्तेत वाटा मिळेल. बीड जिल्ह्यातल्या सर्वच मतदारसंघात युधाजित पंडित यांची ओळख असून त्यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने येणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेला व शिवसैनिकांना सत्तेत आणण्यासाठी त्यांच्या संघटन अनुभव व कार्यपद्धतीचा निश्चितपणे फायदा होईल असा अंदाज असल्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून युधाजित पंडित यांच्याच नावाची घोषणा हईल अशी सूत्रांची खात्रीलायक माहिती असल्याने शिवसेनेच्या या जिल्हा प्रमुख पदाच्या युद्धात गेवराईचीच जीत होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Most Popular

error: Content is protected !!