Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईप्रज्ञासूर्याचे तेजस्वी विचार पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक- ना. धनंजय मुंडे

प्रज्ञासूर्याचे तेजस्वी विचार पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक- ना. धनंजय मुंडे


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धनंजय मुंडे यांनी केले चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांना अभिवादन
मुंबई (रिपोर्टर) भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.


महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व तेजस्वी विचार पिढ्यानपिढ्यासाठी मार्गदर्शक आहेत. समस्त बहुजन समाजाचे उध्दारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करून त्या विचारांवर चालण्याचा निर्धार करू असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. आज देशभरातून आलेले अनुयायी अत्यंत शिस्त व नियमांचे पालन करून अभिवादन करत आहेत, त्या सर्वांना माझे नमन. मुंबई महापालिका प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक अनुयायांनी आज ऑनलाईन अभिवादन केले, त्या सर्वांचेही मनस्वी आभार, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी सर्व अभिवादकांचे आभार व्यक्त केले आहेत. अभिवादनाच्या शासकीय कार्यक्रमास राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे, गृहमंत्री श्री. दिलीप वळसे पाटील, पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री श्री. अस्लाम शेख, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरीताई पेडणेकर यांसह मान्यवर उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!