Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडऊसतोड मुकादमाची आत्महत्या

ऊसतोड मुकादमाची आत्महत्या


बीड (रिपोर्टर)- ऊसतोड मुकादमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.


नवनाथ काशिनाथ कांधारे (वय 52 वर्षे, रा. उमरद खालसा) असे आत्महत्या केलेल्या मुकादमाचे नाव आहे. ते गेल्या काही वर्षांपासून कारखान्यावर टोळ्या घेऊन जात होते. ते विविध आजारांनी ग्रस्त होते. आज सकाळी त्यांनी त्यांच्या शेतातील कोठ्यात पत्र्याच्या अडुला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना होताच बिट अमलदार गोवर्धन सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नवनाथ कांधारे यांच्या काही कोयते पळून गेल्यामुळे ते नैराश्येत आल्याचे समजते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!