Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडकाळ्या बाजारात जाणारा राशनचा ट्रक पकडला अंमळनेर पोलिसांची कारवाई

काळ्या बाजारात जाणारा राशनचा ट्रक पकडला अंमळनेर पोलिसांची कारवाई


बीड (रिपोर्टर)- महसूलच्या भ्रष्टाचारी धोरणामुळे गोरगरिबांच्या तोंडचे राशनचे धान्य सर्रास काळ्या बाजारात जात असल्याची ओरड सर्वस्तरातून होत असताना अंमळनेर पोलिसांनी राशनच्या मालाने भरलेला ट्रक पिंपळवंडी येथे पकडला. तो ठाण्यात आणून डायरीला नोंद करत याची माहिती महसूल विभागाला दिली असून सदरच्या ट्रकमध्ये असलेले धान्य हे कुठल्या गोडाऊनमधले अथवा दुकानदाराचे आहे हे महसूलचे अधिकारी सांगतील. सदरचे धान्य पकडल्यानंतर अंमळनेर पोलिस ठाण्याचे पीआय गोरक्ष पाळवे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

बीड जिल्ह्यामध्ये धान्य माफियांनी आपलं डोकं वर काढत राशनचा माल सर्रासपणे काळ्या बाजारात नेऊन विकण्याचा धंदा सुरू ठेवला आहे. महसूल विभागातला अनागोंदी कारभार, भ्रष्टाचारी धोरण यामुळे धान्य माफियांचे चांगलेच फावते. राशन दुकानदार, महसूल विभाग यांच्या संगनमताने गोरगरिबांसाठी आलेले कमी किमतीतले धान्य हे सर्रास बाजारात नेऊन विकले जाते. असाच धान्याने भरलेला ट्रक हा पिंपळवंडी येथे असल्याची माहिती अंमळनेर पोलिसांचे पीआय गोरक्ष पाळवे यांना झाल्यानंतर ते थेट घटनास्थळी गेले. सदरचा ट्रक हा पोलीस ठाण्यात आणून लावला. डायरीला तशी नोंद केली आणि याची माहिती महसूल विभागाला लेखी पत्राद्वारे दिली. महसूलचे अधिकारी आल्यानंतर हे धान्य कुठल्या कुपन दुकानदाराचे आहे अथवा कुठल्या गोडाऊनमधून काळ्या बाजारात निघाले हे उघड होईल. तत्पुर्वी अंमळनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे अभिनंदन होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!