Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडमहिलेस जिवंत जाळणार्‍या पतीसह दिरास जन्मठेप

महिलेस जिवंत जाळणार्‍या पतीसह दिरास जन्मठेप


मृत्यूपुर्व जबाबावरून न्यायालयाने दिला महत्त्वपुर्ण निकाल
पोखरी येथे घडली होती घटना


बीड (रिपोर्टर):- जमिनीतला हिस्सा का मागते या कारणावरून एका विवाहित महिलेच्या अंगावर तिचा पती, दीर व सासू यांनी संगनमत करून रॉकेल टाकून तिला जिवंत पेटवण्यात आले होते.यात महिला गंभीररित्या भाजल्याने तिला उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला होता. ही घटना नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोखरी येथे घडली होती. या प्रकरणातील आरोपी नवरा, दीर यास न्यायालयाने दोषी ठरवून दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


जमिनीतील हिस्सा का मागते? या कारणावरून मनिषा शहाजी फाळके रा.पोखरी ता.बीड या महिलेच्या अंगावर दि.13. 05. 2016 रोजी तिचा पती शहाजी फाळके याने रॉकेल टाकले व दीर बबन याने पेटवून दिले. या घटनेला सासू सोजरबाई हीने प्रवृत्त केले होते. या घटनेत मनिषा फाळके ही 95 टक्के भाजल्याने तिला उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान तिचा दि.19. 05. 2016 रोजी मृत्यू झाला होता. मृत्युपुर्वी पोलीस कर्मचारी ससाने यांनी जवाब नोंदवला होता. त्यानंतर तेलंगे यांनीही महिलेचा जवाब नोंदवून घेतला होता. त्याप्रकरणी आरोपी शहाजी फाळके (नवरा), बबन फाळके (दीर) आणि सोजरबाई फाळके (सासू) या तिघां-विरूद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आंदोलनाचा तपास आर.बी. पाटील यांनी करून हे प्रकरण बीड येथील चौथे जिल्हा न्यायाधीश आर.एस.पाटील यांच्या कोर्टात दाखल केले होते. यामध्ये नऊ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने मयत महिलेचा मृत्यूपुर्वी जवाब महत्त्वपूर्ण मानत आरोपी शहाजी फाळके व बबन फाळके या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणामध्ये मयत पिता मात्र फितुर झाला होता. या प्रकरणाकडे पोखरी भागातील नागरिकांचे लक्ष लागून होते. पैरवी म्हणून मोहन मिसाळ यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड.भागवत एस.राख यांनी काम पाहिले.

Most Popular

error: Content is protected !!