Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडशिक्षणाधिकारी कुलकर्णी अखेर रजेवर

शिक्षणाधिकारी कुलकर्णी अखेर रजेवर


बीड (रिपोर्टर) बीड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागात राजकीय हस्तक्षेप नवा नाही. प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारीपदी श्रीकांत कुलकर्णी रुजू झाल्यापासून शिक्षण सभापती आणि कुलकर्णी यांच्यातील विसंवाद सर्वश्रूत आहे. याच्यामध्ये मात्र राजकीय लोकांना अनियमित काम करून देण्याची सवय लागलेले अधिकारी खतपाणी घालतात. त्यातून शिक्षणाधिकारी कुलकर्णी कालपासून रजेवर गेले आहेत.

सलग दोन वेळा शिक्षण सभापती आणि कुलकर्णी यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. सभापतींच्या कक्षेत शिक्षणाधिकारी कुलकर्णी हे रडले होते. त्यातूनच अनियमिततेचे तीन प्रकरणे कुलकर्णी यांच्यासमोर सही करण्यासाठी ठेवले होते. मात्र कुलकर्णी यांनी या अनियमित कामांना नकार दिला. त्यातूनच सभापती आणि कुलकर्णी यांच्यातील विसंवाद वाढत गेला. काम करता येत नसेल तर रजेवर जा असे खासगी सुनावल्यानंतर कुलकर्णी यांनी रजेवर जाणे पसंत केले मात्र शिक्षण विभागात एका पदावर नियुक्ती असताना चार-चार-पाच-पाच पदांचा पदभार सांभाळणारे वर्ग 2 चे अधिकारी या पदाचा पदभार घेण्यासाठी उत्सुक आहेत. त्यातूनच आता या अधिकार्‍यांकडे शिक्षण विभागाचा शिक्षणाधिकारी पदाचा पदभार सुपूर्द केला जाईल मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी या अनियमित कामांकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी शिक्षण विभागातून होत आहे. मात्र शिक्षण विभागात नेहमीच झारीतून शुक्राचार्याची भूमिका पार पाडत असतात. त्यातून या अधिकार्‍याकडे शिक्षण विभागाचा पदभार गेल्यास नवल वाटायला नको.

Most Popular

error: Content is protected !!