Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडक्षीरसागरांना जाब विचारण्यासाठी जनआक्रोश मोर्चात मोठया संख्येने सहभागी व्हा - प्रभाकर कोलंगडे

क्षीरसागरांना जाब विचारण्यासाठी जनआक्रोश मोर्चात मोठया संख्येने सहभागी व्हा – प्रभाकर कोलंगडे


बीड (प्रतिनीधी) बीड शहराला बकाल करणार्‍या क्षिरसागरांना आणि नगर पालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शिवसंग्रामच्या वतीने गुरूवार दि. 09 डिसेंबर रोजी नगरपालिकेवर जनआक्रेाश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. अस्वच्छता, अनियमित पाणी पुरवठा, खडडे पडलेले रस्ते, बंद असलेले पथदिवे, सिसिटीव्ही कॅमेरे, सिंग्न्ल यासह बीड शहरातील असंख्य समस्या बाबत जाब विचारण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असुन या मोर्चात बीड शहरातील नागरीकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसंग्रामचे ज्येष्ठ नेते तथा भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर अप्पा कोलंगडे यांनी कले आहे.

मागील 35 वर्षापासुन बीड नगर पालिकेवर क्षिरसागर कुटूंबीयांची एक हाती सत्ता आहे. वेळो वेळी केंद्र आणि राज्या सरकारकडून बीड नगर पालिकेसाठी मोठया प्रमाणात निधी मिळाला परंतू बीड शहराचा विकास करण्याऐवजी क्षिरसागर कुटूंबीयांनी ठेकेदार पोसुन स्व्त:चे हित साधण्याचे काम केले आहे. बोकाळलेल्या भ्रष्टाचारामुळे बीड शहरातील नागरीक मुलभूत सुविधांपासुन वंचित राहिले आहेत. यामुळे बीड शहराचा विकास खुंटला आहे. यात सर्वसामान्य् बीडकर भरडला जात आहे. यामुळे बीड शहरातील नागरीकांच्या न्याय हक्कासाठी वाचाफोडनारा हा जनआक्रोश मोर्चा शिवसंग्रामच्या वतीने काढण्यात येणार आहे. त्याच बरोबर कोविड – 19 च्या सर्व नियमाचे पालन करून हा मोर्चा काढला जाणार आहे. तरी या मोर्चास मोठया संख्येन सहभागी व्हावे असे प्रभाकर कोलंगडे यांनी म्हणटले आहे.

Most Popular

error: Content is protected !!