Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडशेतकी अधिकारी, शेतकर्‍यात हमरा-तुमरी!

शेतकी अधिकारी, शेतकर्‍यात हमरा-तुमरी!


जयमहेश कारखान्याकडून शेतकर्‍यांची पिळवणुक; आत्मदहनाचा इशारा देणारा शेतकरी अद्यापही बेपत्ताच
माजलगाव (रिपोर्टर):- जयमहेश सहकारी साखर कारखान्याकडून ऊस घेवून जाण्यास नकार दिल्याने एका शेतकर्‍याने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी शेतकी अधिकारी आनंदगाव येथे आला असता शेतकर्‍यांनी आपला संताप व्यक्त करत काही शेतकरी अधिकार्‍यांवर धावून गेले होते. या दरम्यान शेतकी अधिकारी आणि शेतकर्‍यात चांगलीच हमरा-तुमरी झाली. पोलीसांनी मध्यस्थी केल्याने वाद टळला.


माजलगाव तालुक्यातील जयमहेश सहकारी साखर कारखान्याने सत्यप्रेम थावरे यांचा ऊस घेवून नकार दिल्याने सदरील शेतकर्‍याने ऊसाचा फड जाळुन आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. या इशार्‍याने प्रशासन आणि कारखाना चांगलाच हादरला. आत्मदहनाचा इशारा देणारा शेतकरी अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध पोलीस प्रशासन घेत आहे. कारखान्याचा शेतकी अधिकारी शेतकर्‍यांशी चर्चा करण्यासाठी आनंदगाव येथे आला होता. यावेळी गंगाभीषण थावरेंसह आदी शेतकरी उपस्थित होते. शेतकी अधिकार्‍यास शेतकर्‍याने चांगलेच सुनावले. शेतकी अधिकारी आणि शेतकर्‍यात यावेळी हमरा-तुमरी झाली. उपस्थित असलेल्या पोलीसांनी वाद मिटवला.

Most Popular

error: Content is protected !!