Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeकोरोना1 हजार 47 पैकी 49 बाधीत आकडा कमी असला तरी दुर्लक्ष नको

1 हजार 47 पैकी 49 बाधीत आकडा कमी असला तरी दुर्लक्ष नको


बीड (रिपोर्टर)- जिल्हाभरातल्या कोविड सेंटरमधून तपासण्यात आलेल्या 1 हजार 47 स्वॅबपैकी 998 स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर 49 जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या साठच्या आत असल्याने समाधान व्यक्त होत असले तरी कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्ससह मास्कचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


   आज दुपारी बारा वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार 1 हजार 47 संशयितांची तपासणी केली असता यामध्ये 49 जण कोरोनाबाधीत म्हणून आढळून आले तर 998 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. बाधीतांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 10, आष्टी 12, बीड 16, गेवराई 2,केज 2, माजलगाव 1, परळी 4, वडवणी तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. 

Most Popular

error: Content is protected !!