Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडउपोषणकर्ती महिला झाडावर चढून बसली

उपोषणकर्ती महिला झाडावर चढून बसली


सफाई कामगार पदावरून कमी केल्याने महिलेचे नऊ दिवसापासून कलेक्टर कचेरीसमोर अमरण उपोषण
बीड (रिपोर्टर):- बीड नगर पालिका अंतर्गत सफाई कामगार म्हणून कार्यरत असणार्‍या दोन महिलांना कामावरून कमी करण्यात आले होते. या महिला गेल्या नऊ महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासस बसल्या आहेत. महिलांच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही. आज सकाळी यातील एक महिला समोरील लिंबाच्या झाडावर चढून बसल्याने पोलीस प्रशासनासह महसूल विभागाची चांगलीच धावपळ उडाली होती. महिलेस खालील उतरवण्यासाठी पोलीस विनवण्या करत होते. मात्र जोपर्यंत कामावर घेण्याचा लेखी कागद दिला जात नाही तोपर्यंत आपण खाली उतरणार नसल्याचा पवित्रा महिलेने घेतला होता. दुपारी दीड वाजता साईनाथ ठोंबरे यांच्या विनंतीवरून महिला झाडावरून खाली उतरली. उपजिल्हाधिकारी राऊत यांनी सदरील महिलेस लेखी आश्‍वासन दिले.


अनिता बचुटे यासह अन्य एक महिलेस कामावरून कमी करण्यात आले. या महिला बीड नगर पालिके अंतर्गत सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. कामावर घ्यावे म्हणून रोजंदारी मजुर सेनेच्या वतीने अनेकवेळा निवेदन देण्यात आले, आंदोलन करण्यात आले मात्र याची दखल घेतली जात नसल्याने या महिला पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहेत. यामध्ये अनिता बचुटे, पंचशिला शिनगारे, राजकुमार जोगदंड, भाई गौतम आगळे यांचा समावेश होता. आंदोलनकर्त्यांची दखल जिल्हा प्रशासन घेत (पान 7 वर)
नसल्याने आज अनिता बचुटे या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील लिंबाच्या झााडावर चढून बसल्या. या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून महिलेस खाली उतरण्याची विनंती केली. मात्र महिलेने प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत आपल्या कशा पद्धतीने प्रशासन झळ करत आहे याची इत्यंभुत माहिती सांगितली. जोपर्यंत नियुक्तीचं लेखीपत्र दिलं जात नाही तोपर्यंत आपण खाली उतरणार नसल्याचा आक्रमक पवित्रा महिलेने घेतला. जिल्हाधिकारी यांनीही कार्यालयातील दोन व्यक्तींना महिलेशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते. मात्र महिला दुपारी 1 वाजेपर्यंत आपल्या मतावर ठाम होती. दीड वाजता शिवाजीनगर ठाण्याचे साईनाथ ठोंबरे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी महिलेस खाली उतरण्याची विनंती केली, त्यानुसार महिला खाली उतरली.

पोलीस प्रशासनासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी
नियुक्तीची हमी दिल्याशिवाय खाली उतरणार नाही; महिलेची भूमिका

Most Popular

error: Content is protected !!