Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमनेकनूर हद्दीत दरोडेखोरांचा सशस्त्र धुमाकूळ

नेकनूर हद्दीत दरोडेखोरांचा सशस्त्र धुमाकूळ


सफेपुर, सुलतानपुरमध्ये मारहाण करून नगदीसह सोन्याचे दागिने लुटले
नेकनूरमध्ये चोरीचा प्रयत्न; दरोडेखोरांच्या दहशतीने नागरीकात भिती

नेकनूर/चौसाळा (रिपोर्टर):- नेकनूर हद्दीमध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी रात्री धुमाकूळ घातला. सुलतानपुर येथे एका जणास मारहाण करून त्याच्याकडील सोन्या, चांदीचे दागिने लुटून नेले. त्याचबरोबर सफेपुर येथेही दोघांना मारहाण करून लुट करण्यात आली. चोरट्याने नेकनूर येथेही दोन ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना चोरी करण्यात यश आले नाही. एकाच रात्री तीन ठिकाणी धुमाकूळ घातल्याने परिसरातील नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


नेकनूरपासुन काही अंतरावर असलेल्या सुलतानपुर येथील अशोक दगडु नाईकवाडे यांच्या घरी अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश केला. त्यांना दरोडेखोराने गजाने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. दरोडेखोराने त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने लुटले. त्यानंतर दरोडेखोरांनी सफेपुर येथे धुमाकूळ घातला. येथील रामभाऊ किसन घोडके, गोरख रामभाऊ घोडके या दोघांना मारहाण करत त्यांच्या जवळील 7 ग्रॅम सोन्याचे दागिने जबरीने लुटून नेले. नेकनूर येथे ही माजी सरपंच शेख आझम पाशा, पांडुरंग होमकर यांच्या घरीही चोरीचा प्रयत्न केला. मात्र येथील नागरिक सतर्क होते. त्यांना दरोडेखोर आल्याचे समजताच नेकनूूर पोलीसांशी संपर्क साधला. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेण्याच्या आधी दरोडेखोर पसार झाले. दरम्यान दरोडेखोरांनी या ठिकाणी दगडफेक केली असल्याचे सांगण्यात येते. एकाज रात्री दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा आणि एका ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न झाल्याने नेकनूूर हद्दीमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तिघांना बीडच्या जिल्हा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञात दरोडेखोरांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!