Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडवडवणीमहाराणी ताराबाई विद्यालयाचे दोन विद्यार्थी कोरोना पाँझिटिव्ह

महाराणी ताराबाई विद्यालयाचे दोन विद्यार्थी कोरोना पाँझिटिव्ह


शाळा बंद,विद्यार्थी ठणठणीत,लक्षण आढल्यास तपासणी करुन घ्या  – प्रशासन

वडवणी (रिपोर्टर):- वडवणी शहरातील महाराणी ताराबाई विद्यालयातील दोन विद्यार्थी कोरोना पाँझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून सदरील विद्यार्थ्याची प्रकृती ठणठणीत असून उपचारासाठी जिल्हा रुग्णालय बीड याठिकाणी दाखल करण्यात आले आहे. शासनाच्या आदेश नियमावली प्रमाणे शाळा बंद करण्यात आली असून सदरील विद्यार्थ्याची प्रकृती ठणठणीत आहे.अस आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले असून पालकासह विद्यार्थ्यानो घाबरुन जाऊ नका,काळजी घ्या आणि अफावर विश्वास ठेवू नका असे आव्हान देखील करण्यात येत आहे.

कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी आरोग्यसह जिल्हा प्रशासानाकडून कठोर पावल उचलण्यात येत आसतानाच दुसरीकडे शासनाने शाळा सुरु करण्याचा  सूचना दिल्या आहेत.विद्यार्थी देखील शाळेत जावू लागत आसतानाच काल वडवणी शहरातील महाराणी ताराबाई माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ७ वी वर्गातील १३ वर्षीय विद्यार्थिनी व इयत्ता १० वी वर्गातील १६ वर्षीय विद्यार्थ्याची कोरोना चाचणी पाँझिटिव्ह आली आहे.तर सदरील विद्यार्थी हे शहरातीलाच रहिवाशी असल्याचे सांगण्यात आले असून त्यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.शासनाच्या आदेश नियमावली प्रमाणे शाळा बंद ठेवण्यात आली आहे.तर संपर्कातील विद्यार्थी यांना कोरंन्टाईन होण्याच्या सुचना दिल्या असून लक्षण आढळल्यास तात्काळ कोरोना चाचणी करुन घेण्यात यावी अस आव्हान देखील करण्यात आल आसल्याची माहिती आरोग्य तालुका आधिकारी डाँ.ज्ञानेश्वर निपटे यांनी रिपोर्टरला दिली आहे.तर कालच्या रिपोर्ट मध्ये डोंगरच्या वाडी येथील तीन रुग्ण पाँझिटिव्ह आले असून असे एकुण ५ रुग्ण पाँझिटिव्ह आलेले आहेत.तरी पालकासह विद्यार्थ्यानी घाबरु जाऊ नये,काळजी घ्यावी व अफवावर विश्वास ठेवू नये असे आव्हान देखील करण्यात येत नाही 

Most Popular

error: Content is protected !!