Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडएसटीच्या चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

एसटीच्या चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न


परळी (रिपोर्टर) महाराष्ट्रात गेल्या 34 दिवसांनंतर काल दि.8 रोजी परळी आगारातून बस सुटली.परंतु यामुळे संपात फुट पडली.काल परळी आगारातून बस सुटली आणि आज एका चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

एसटी कामगारांच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. 34 दिवसांनंतर काल दि. 8 रोजी परळी आगारातून बस सुटली.परंतु यामुळे संपांत फुट पडली. अनेक दिवसांपासूनच्या कामगारांच्या एकजुटीला तोडण्यात प्रशासन यशस्वी झाले. परंतु आज दि.9 रोजी सकाळी वेगळीच घटना समोर आली आहे. काल परळी आगारातून बस सुटली आणि आज सकाळी नागनाथ गित्ते या चालकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. परळी आगारातून काल जी बस सुटली होती त्या बसचा हा चालक असल्याची माहिती समोर येत आहे.नेमका आत्महत्येचा प्रयत्न का केला गेला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या कामगाराला अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!