Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईअप्पर पोलिस अधिक्षक लांजेवार यांच्या पथकाची गेवराईत मोठी कारवाई

अप्पर पोलिस अधिक्षक लांजेवार यांच्या पथकाची गेवराईत मोठी कारवाई


गेवराई (रिपोर्टर) येथील बायपास रोडलगत सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर अप्पर पोलिस अधिक्षक लांजेवार यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी आरोपी फरार झाले असून पोलिसांनी 90 हजार नगदी, 4 फोरव्हीलर, 12 मोटारसायकल, दोन मोबाईलसह जुगार साहित्य असा मिळून जवळपास 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कारवाई आज पहाटे करण्यात आली असून गेवराई पोलिस ठाण्यात अज्ञात 15 ते 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सदरील घटनास्थळावरुन नगदी लाखोंची रक्कम जप्त करण्यात आलेली असताना केवळ नगदी 90 हजार गुन्ह्यात दाखवण्यात आली ? अशी चर्चा सध्या सुरु आहे.


याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गेवराई येथे बायपासलगत एका पत्र्याच्या शेडमध्ये पत्त्याचा क्लब सुरु असल्याची माहिती अप्पर पोलिस अधिक्षक लांजेवार यांना मिळाली. त्यानुसार सदरील याठिकाणी सापळा रचून आज गुरुवारी पहाटे धाड टाकण्यात आली. यावेळी जुगार खेळणारे आरोपी फरार झाले. मात्र त्यांच्या 4 फोरव्हीलर , 12 मोटारसायकल, दोन मोबाईल, नगदी 90 हजार, जुगार साहित्य, पिण्याच्या पाण्याचे जार, लोखंडी पलंग असे जवळपास 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करुन तो येथील पोलिस ठाण्यात आणण्यात आला आहे. याप्रकरणी अज्ञात 15 ते 20 आरोपींविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सपोनि प्रफुल्ल साबळे, पो.काँ . जायभाये, पोलिस हवालदार नागरे हे करत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!