Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडशिवसंग्रामचा नगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा मोर्चाने शहर दणाणले, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती

शिवसंग्रामचा नगरपालिकेवर जनआक्रोश मोर्चा मोर्चाने शहर दणाणले, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती


बीड (रिपोर्टर) बीड नगरपालिकेकडून विकासाचे मोठमोठे दावे केले जातात मात्र शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. नागरिकांना वेळेवर पाण्याचा पुरवठा केला जात नाही. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. यासह इतर प्रश्‍नांसाठी आज शिवसंग्रामच्या वतीने नगरपालिका कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी नगरपालिका प्रशासनाविरोधात प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केली. शिवसंग्रामच्या मोर्चाने शहर दणाणून गेलं होतं. या मोर्चात महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघाला होता.


गेल्या 35 वर्षांपासून बीड नगरपालिकेवर डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे एकहाती वर्चस्व आहे. नगरपालिकेच्या अंतर्गत आतापर्यंत विकासाची मोठ्या प्रमाणात कामे व्हायला होती. मात्र नगरपालिका फक्त बीडकरांची दिशाभूल करत आली. विविध योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी आणला मात्र या निधीचा योग्य पद्धतीने उपयोग करता आलेला नाही. शहरातील अनेक प्रभागात साधे रस्तेही व्यवस्थीत नाहीत. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे नागरिकांना मणक्याच्या आजाराचा त्रास होऊ लागलाय. दोन्ही धरणे पुर्णपणे भरलेले असताना दहा ते पंधरा दिवसाला पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील सीसीटीव्हीसह सिग्नल बंद आहेत. नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज शिवसंग्रामच्या वतीने कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केली. या घोषणांनी शहर दणाणून गेले होते. या वेळी प्रभाकर कोलंगडे, काकडे, राहुल मस्के, घुमरे, खालेक पेंटर, लक्ष्मण ढवळे, रामहरी मेटे, मनोज जाधव, प्रभाळे, सुहास पाटील, कवडे, मुकुंद गोरे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या वेळी नगरपालिका कार्यालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त कडेकोट तैनात करण्यात आला होता. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी सेनादलाचे प्रमुख बिपीन रावत यांना प्रथम श्रध्दांजली अर्पण केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!