Tuesday, January 25, 2022
No menu items!
HomeUncategorizedपी.आय.पठाण, सय्यद अब्दुल्ला यांच्यात बाचाबाची; पोलीस ठाण्यासमोर आंदोलन आ.धसांनी मध्यस्थी करून प्रकरण...

पी.आय.पठाण, सय्यद अब्दुल्ला यांच्यात बाचाबाची; पोलीस ठाण्यासमोर आंदोलन आ.धसांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले


पाटोदा (रिपोर्टर) पाटोदा ठाण्याचे पी.आय.आणि माजी जि.प.अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांच्यात बाचाबाची झाली. या बाचाबाचीवरून अब्दुल्ला यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. यामध्ये आ.सुरेश धस यांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले आहे. पोलीस अधिकार्‍याने मुलांना मारहाण केल्याच्या कारणावरून हा सगळा राडा झाला असल्याचे सांगण्यात आले.
पाटोदा ठाण्याचे पीएसआय पठाण आणि माजी जि.प.अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला य ांच्यात आज सकाळी चांगलीच बाचाबाची झाली. अब्दुल्ला यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. पठाण यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी अब्दुला यांनी लावून धरली होती. पठाण यांनी मुलांना मारहाण केल्याचा आरोप अब्दुल्ला यांनी केला आहे. या राडा पाहता आ.सुरेश धस घटनास्थळी आले व त्यांनी सदरील हे प्रकरण मिटवले असल्याचे सांगण्यात आले.

inbound1385735312194610187
ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!