Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडपदवीधर निवडणूकीमुळे दहावी बारावीच्या परिक्षा केंद्रात बदल

पदवीधर निवडणूकीमुळे दहावी बारावीच्या परिक्षा केंद्रात बदल


बीड (रिपोर्टर) १ डिसेंबर रोजी पदवीधर मतदार संघात मतदान होत आहे. या मतदानासाठी उच्च माध्यमिक शाळा निवडणूक विभागाने त्यादिवशी ताब्यात घेतल्यामुळे याठिकाणी चालू असलेल्या दहावी आणि बारावीच्या पूरवणीपरिक्षेच्या स्थळामध्ये शिक्षण विभागाने बदल केला असून यात केंद्राच्या बाजूला असलेल्या इमारतीमध्येच हे परिक्षा केंद्र हलवण्यात आलेले आहे. दि.१ डिसेंबर रोजी दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १ हा पेपर आहे.

तर बारावीचा गणित, संख्याशास्त्र या विषयाचा पेपर आहे. हे दोन्ही पेपर बीड शहराध्ये भगवान विद्यालय याठिकाणी होणारे पेपर भा.वा.सानप प्राथमिक विद्यालय बीड याठिकाणी होतील. तर चंपावती विद्यालयात होणारे पेपर लगतच्याच चंपावती इंग्लीश स्कूलमध्ये घेण्यात येतील. बलभिम महाविद्यालायमध्ये होणारे पेपर मिलीया कन्या शाळा विद्यालय याठिकाणी घेण्यात येणार आहे. माजलगाव येथील सिध्देश्‍वर विद्यालयात होणारे परिक्षेचे पेपर हे शेजारी असलेल्या सिध्देश्‍वर वरिष्ट महाविद्यालयात घेण्यात येणार आहे. परळी वैजनाथ येथील न्यू हायस्कूल थर्मल याठिकाणी इ.दहावीचे होणारे पेपर स्वामी विवेकानंद महाविद्यालय परळी याठिकाणी घेण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंद महाविद्यालय परळी हे न्यू हायस्कूल शेजारी आहे. तर शिरूर कासार येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील इ.दहावीचे पेपर याच शाळेच्या शेजारी असलेल्या जि.प.कन्या शाळा याठिकाणी घेण्यात येणार आहे. तरी याठिकाणी परिक्षा देणार्‍या इ.बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि शिक्षणाधिकारी डॉ.विक्रम सारूक यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!