Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमसय्यद अब्दुल्ला यांच्यासह पन्नास जणांवर गुन्हा दाखल

सय्यद अब्दुल्ला यांच्यासह पन्नास जणांवर गुन्हा दाखल


बीड (रिपोर्टर) जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला सय्यद यासीन आणि पाटोदा पोलीस ठाण्याचे फौजदार अफरोज पठाण यांच्यात काल बाचाबाची झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पाटोदा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून पोलीस उपनिरीक्षक पठाण यांच्या विरुद्ध घोषणाबाजी आणि जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी सय्यद अब्दुल्ला यांच्यासह 50 ते 60 जणांविरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला सय्यद यासीन यांच्यात आणि फौजदारात काल बाचाबाची झाल्यानंतर अब्दुल्ला यांच्या समर्थकांनी पाटोदा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत फौजदाराविरोधात घोषणाबाजी दिली या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्याच्या मनिषा मोहन पाटील यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पाटोदा पोलीस ठाण्यात वरील नागरिकांनी गैरकायद्याची मंडळी जमवून ठाण्यात येऊन रात्री दहाच्या नंतर शहरातील हॉटेल, टपर्‍या बंद करून लोकांना का त्रास देता? असे म्हणून ठाण्यात आरडाओरड करत पोलीस उपनिरीक्षक पठाण यांच्या विरोधात घोषणाबाजी केली व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी अब्दुल यासीन सय्यद, शहानवाज अब्दुल सय्यद, साबीर सय्यद, आदम सय्यद, शहबाज सय्यद, सिकंदर सय्यद, नाजेम सय्यद, प्रकाश जावळे, सय्यद जावेद, सय्यद मुजीब, वाहेद पठाण, साहील पठाण, इस्लाक पठाण, सय्यद ताफी, शेख इलियास, प्रणव जावळे, बाळासाहेब जावळे यांच्यासह इतर पन्नास ते साठ जणांविरोधात कलम 143, 145, 149, 268, 269, 188 भा.दं.वि. सह कलम म.पो.अ. 37/135 सह कलम 51 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!