Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमअटक करण्याची धमकी देऊन डॉक्टराकडून 90 हजार उकळले

अटक करण्याची धमकी देऊन डॉक्टराकडून 90 हजार उकळले

बीड (रिपोर्टर) तुमच्या विरुद्ध एका पेशन्टच्या वडिलाची तक्रार आहे, तुम्हाला नागपूर येथे पोलीस स्टेशनला यावे लागेल नाही तर तुम्हाला आम्ही अटक करू, असे म्हणून एका तोतया पोलीसाने डॉक्टराकडून 90 हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी काल बीड शहर पोलिसात तोतया पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मसरत नगर येथील डॉ. पटेल शेख नसिरुद्दीन शेख यांना त्यांच्या फोनवर एका भामट्याने फोन करून ‘तुमच्या विरुद्ध एका पेशन्टच्या वडिलाची तक्रार आहे, मी पोलीस बोलत आहे, तुम्हाला नागपूर येथे पोलीस स्टेशनला यावे लागेल नसता आम्ही तुम्हाला अटक करू, अशी धमकी देऊन डॉक्टराला त्या तोतया पोलिसाने पैशाची मागणी केली. डॉक्टराने त्याच्या गुगल पे द्वारे 90 हजार रुपये पाठवल्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काल डॉक्टराने बीड शहर पोलीस ठाणे गाठून अज्ञात तोतया पोलीसाविरोधात तक्रार दिली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!