Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडआरोग्य विभागाची परीक्षा पुन्हा होणार

आरोग्य विभागाची परीक्षा पुन्हा होणार


सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक, यातील दोषींना अशी शिक्षा करू की पुन्हा पेपर फोडण्याची हिम्मत कोणी करणार नाही -अजित पवार


मुंबई/बीड (रिपोर्टर) आरोग्य भरती परिक्षेतील अपहार उघडकीस आल्यानंतर बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल होऊन अटकसत्र सुरू झाल्याने भरती प्रक्रियेतील भ्रष्ट अधिकार्‍यांचे धाबे दणाणले तर दुसरीकडे इमाने इतबारे परीक्षा देणार्‍या उमेदवारात संताप पहावयास मिळाला. मात्र या प्रकरणाची गांभीर्याने दखल राज्य सरकारने घेतली असून आरोग्य भरतीतील गट क आणि गट ड ची पुन्हा परीक्षा घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रकरण बैठक होऊन पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.
आरोग्य भरती परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला. त्याचे धागेदोरे थेट बीड जिल्ह्यापर्यंत येऊन पोहचले. बीडमध्ये गुन्हा दाखल होऊन पाच जणांना अटकही करण्यात आले. एका उमेदवाराकडून दहा ते पंधरा लाख रुपये घेऊन घोटाळा करणार्‍या दोषींविरोधात एकीकडे कडक पावले उचलले जात असतानाच दुसरीकडे इमाने इतबारे परीक्षा देणार्‍या उमेदवारांचा संताप पाहता आणि परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी पाहता राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज पुण्यामध्ये पत्रकारांनी आरोग्य विभागाच्या परीक्षेसंदर्भात विचारले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (पान 7 वर)
उपस्थितीत सोमवारी बैठक होणार असल्याचे सांगून त्यानंतर या परीक्षेबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पवारांनी म्हटले. आरोग्य विभागासारखी एवढी मोठी परीक्षा एमपीएससीकडून घेणे अशक्य आहे, असे म्हणत आरोग्य भरतीत गैरप्रकार झाला आहे. यामध्ये जे दोषी असतील त्यांना अशी शिक्षा करू की, पुन्हा कोणाचे पेपर फोडण्याची हिम्मत होणार नाही, असे म्हणत अजित पवारांनी आरोग्य विभागाची गट क आणि गट ड ची परीक्षा सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होईल, त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल, असे म्हटले. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा होणार असल्याचे सुत्रांचे सांगणे आहे.

बीडमध्ये दोन वैद्यकीय अधिकारी रडारवर?
आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेमध्ये झालेला अनागोंदी कारभार आणि घोटाळा उघडकीस येत आहे. या घोटाळ्यात दोन वैद्यकीय अधिकारी तपासी यंत्रणेच्या रडारवर असल्याचे सांगण्यात येते. रिपोर्टरला मिळालेल्या माहितीनुसार यात आणखी बरेच जण अडकले असून ज्यांनी या घोटाळ्या हात ओले करून घेतले त्यांच्या हातात बेड्या पडणार आहेत.

Most Popular

error: Content is protected !!