Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडआष्टीआष्टीतला बिबट्या पिसाळला, पारगावात वृद्ध महिलेवर हल्ला

आष्टीतला बिबट्या पिसाळला, पारगावात वृद्ध महिलेवर हल्ला

आष्टी (रिपोर्टर):- तालुक्यामध्ये बिबट्याचे मागिले पाच ते सहा दिवसांपासून हल्ल्याचे सत्र सुरूच असून केलेल्या वेगवेगळ्या हल्ल्यात आत्तापर्यंत दोन जणांना प्राण गमवावे लागले आहेत. काल दि.28 रोजी आष्टी शहरापासून जवळच असलेल्या दिंडे वस्तीवरील मायलेकरावर सायंकाळी 6 च्या सुमारास हल्ला केल्याची घटना घडली असून यामध्ये त्यांना दुखापत झाली आहे. या मायलेकरावर आष्टीच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.हि घटना ताजी असतानाच आज पुन्हा सकाळी 11 च्या सुमारास जोगेश्वरी पारगाव येथील 65 वर्षीय महिला शेतात गवत घेण्यासाठी गेली असता बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली असून आष्टी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे.घटनास्थळी वनविभाग दाखल झाले आहे. वन विभागाचे शंभरावर कर्मचारी बिबट्याचा शोध घेत असून ठिकठिकाणी बिबट्यासाठी सापळे रचण्यात आले आहेत. घटनास्थळी आ. बाळासाहेब आजबे यांनी भेट दिली.

तालुक्यात बिबट्याचे हल्ल्याचे सत्र दररोजच सुरू असून या वेगवेगळ्या हल्ल्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून,दिंडे वस्तीवस्तीवरील शिलावती दिंडे, अभिषेक, दिंडे, या मायलेकांवरती आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा सकाळी 11 च्या दरम्यान जोगेश्वरी पारगांव येथील शालन शहाजी भोसले वय (65) वर्षे या घराजवळील शेतामध्ये गवत घेण्यासाठी गेल्या असता अचानक केलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत.त्यांना आष्टी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अहमदनगर येथे पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी आ. सुरेश धस वनविभागाचे पथक दाखल झाले असून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजय धोंडे यांनी या महिलेची आष्टी ग्रामीण रुग्णालयात भेट घेऊन डॉक्टरांशी चर्चा केली सरपंच तात्यासाहेब कदम, उपसरपंच अण्णासाहेब भोपळे हे घटनास्थळी उपस्थित होते. पुण्याचे रेस्क्यू अ‍ॅनिमल पथक आष्टीत दाखल औरंगाबाद ,अमरावती ,नांदेड,बीडमधील वन विभागाची पथके नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मागील तीन चार दिवसांपासून प्रयत्न करत असताना त्यांना यश न आल्याने आज रविवारी पुण्याचे रेस्क्यू अ‍ॅनिमल पथक आष्टीत दाखल झाले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!