Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडमाजलगावजय महेश कारखान्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व ऊस उत्पादक शेतकर्‍यांची 15...

जय महेश कारखान्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व ऊस उत्पादक शेतकर्‍यांची 15 टक्के व्याजाची रक्कम द्यावी-गंगाभिषण थावरे

बीड (रिपोर्टर)ः- जय महेश सहकारी साखर कारखान्याने सन 2018-19 साली 6141 शेतकर्‍यांपैकी 6090 शेतकर्‍यांचे दिशाभूल करुन कारखाना सुरू करण्याचे आमिषाने चुकीची माहिती सांगून 15 टक्के व्याजाची रक्कम मागणार नाही असे लिहून घेतले. तसेच काही शेतकर्‍यांच्या खोट्या सह्या करुन व्याज माफ केल्याचे लिहून घेतले आणि त्या शेतकर्‍यांना 15 टक्के व्याजाची रक्कम दिली नाही या दोन्हीमुळे जय महेश सहकारी साखर कारखान्यावर फसवणुकीचा गुन्हा नांद करुन त्यांच्याकडून या उस उत्पादक शेतकर्‍यांना 15 टक्के व्याजाची रक्कम अदा करावी या मागणीचे निवेदन शेकापचे नेते भाई गंगाभिषण थावरे राज्याच्या साखर आयुक्तांना पाठवले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, 18-19 या आर्थीक वर्षात जय महेश शुगर पवारवाडी या कारखान्याने ऊसाच्या बिलाची रक्कम दिली नाही म्हणून औरंगाबाद खंडपिठात याचीका दाखल केली होती. या याचिकेच्या निकालानूसार साखर आयुक्त आणि जिल्हाधिकारी बीड यांना अमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. अमलबजावणी होत नसल्याने परत याबाबत खंडपिठात आणि राज्यपालाकडे दाद मागवितल्यानूसार या शेतकर्‍यांना तात्काळ रक्कम देण्याचे आदेशीत केले होते. त्यानुसार या कारखान्याने 6090 शेतकर्‍यांचे कारखाना सुरू करण्याचा आमिषाने 15 टक्के व्याजाची रक्कम मागणार नाही असे स्वय इच्छेने व पुर्व समंतीने मान्य केल्याचे लिहून घेतले होेते. त्यांच्या सह्या घेतल्या होत्या. 19 मयत आणि 22 ऊस उत्पादक शेतकरी बाहेर गेल्याचे दाखवून त्याच्या नावे असलेली देय असलेली व्याजाची रकमेचा पाच लाखाचा धनादेश औरंगाबाद येथील प्रादेशीक साखर आयुक्तांना देतांना या शेतकर्‍यांची यादी दिली नाही. या सर्वांमुळे जय महेश साखर कारखान्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन वंचीत शेतकर्‍यांना 15 टक्के व्याजाची रक्कम दयावे असे भाई गंगाभिषण थावरे यांनी म्हटले आहे.

Most Popular

error: Content is protected !!