Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमजालना रोडवरील अ‍ॅटोमोबाईलचे दुकान फोडले सात लाखाचा माल पळवला

जालना रोडवरील अ‍ॅटोमोबाईलचे दुकान फोडले सात लाखाचा माल पळवला

बीड (रिपोर्टर):- अ‍ॅटोमोबाईलच्या दुकानाचा पाठीमागील पत्रा उचकून आतमध्ये प्रवेश करत आतील ऑईलसह इतर स्पेअर पार्टस असा एकूण सहा ते सात लाखा रूपयाचा माल चोरून नेल्याची घटना रात्री घडली. सकाळी दुकानदाराला आपल्या दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यातमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
महादेव बापुराव मोरे यांचे जालना रोडवर राहुल अ‍ॅटोमोबाईलस नावाचे दुकान आहे. रात्री चोरट्याने त्यांच्या दुकानाचा पाठीमागील पत्रा उचकून आतमध्ये प्रवेश केला. आतील इंजिनचे ऑईल व गाड्यांचे स्पेअर पार्ट असा एकूण सहा ते सात लाख रूपयांचा माल चोरून नेला. सदरील हा चोरीचा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी दुकानाचे मालक महादेव मोरे यांनी बीड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनास्थळी शहर ठाण्याचे पोलिस दाखल झाले होते. दरम्यान गेल्या काही दिवसापासून बीड शहरासह जिल्हाभरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!