Friday, January 28, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रगोपीनाथ मुंडेंच्या तोडीचा नेता भाजपात दिसत नाही ,शरद पवार प्रचंड लोकप्रिय आणि...

गोपीनाथ मुंडेंच्या तोडीचा नेता भाजपात दिसत नाही ,शरद पवार प्रचंड लोकप्रिय आणि जनतेशी थेट संबंध असणारे नेते-संजय राऊत

बीड/मुंबई (रिपोर्टर) ज्यांच्याशी संवाद साधता येईल, राज्याचे राजकारण समजेल आणि शिवसेना काय आहे? हे माहित असणारा एकही नेता आज भाजपात दिसत नाही असे खा.संजय राऊत यांनी म्हणत स्व.गोपीनाथराव मुंडे असते तर आज राज्याचे राजकारण वेगळे असते. आज बहुजन समाजाची चळवळ दिसत आहे. त्याचे ते प्रणेते आहेत असे संजय राऊत यांनी म्हणत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्राच्या जडणघडणीत शरद पवारांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी म्हटले.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रवादीचे सर्वासर्वे खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संजय राऊत यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया दिली. त्यावेळी संजय राऊत म्हणाले, गोपीनाथ मुंडे असते तर आज राज्याचे राजकारण वेगळे असते. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती रहावी यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. आज राज्याचे राजकारण समजणारा ज्यांच्याशी संवाद साधता येईल आणि शिवसेना काय आहे? हे माहित असणारा गोपीनाथ मुंडे यांच्या तोडीचा नेता भाजपात दिसत नाही. आम्ही त्यांच्यासोबत 25 ते 30 वर्ष फार जवळून काम केले. तेसुध्दा एक लोकप्रिय नेते होते. आज बहुजन समाजाची चळवळ दिसत आहे त्याचे ते प्रणेते आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी खा.शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले की, महाराष्ट्राचे देशाचे सर्वात ज्येष्ट अनुभवी नेते म्हणून आम्ही शरद पवार यांच्याकडे पाहतो. महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवारांचं मोठे योगदान आहे. देशाचे संरक्षणमंत्री, कृषीमंत्री असताना त्या दोन्ही क्षेत्रात हा देश आत्मनिर्भर व्हावा म्हणून त्यांनी त्यावेळी अनेक पाऊले टाकली. ते प्रचंड लोकप्रिय जनतेशी थेट संबंध असलेले आणि राजकारणात असूनही हवेत गप्पा न मारणारे असे नेते आहेत. असे कौतुक त्यांनी यावेळी केले.

Most Popular

error: Content is protected !!